Home स्टोरी अर्धवट नाले सफाईमुळे मंगलराघोनगर प्रभागातील नाला ओव्हर फ्लो!

अर्धवट नाले सफाईमुळे मंगलराघोनगर प्रभागातील नाला ओव्हर फ्लो!

262

तरीही आयुक्त महोदय ठेकेदाराला पैसे देणार का? संतत्प नागरीकांचा आयुक्तांना प्रश्न!

कल्याण प्रतिनिधी: (आनंद गायकवाड): – कल्याण डोंबिवली महापालिका अंतर्गत असलेल्या मोठे तसेच मध्यम स्वरूपातील नाले आणि गटारांच्या सफाईचे ठेके हे विविध खाजगी संस्था – संघटनांना देण्यात आला आहे. या संस्था – संघटना बहुतांशी आजी – माजी नगरसेवकांच्याच आहेत . याच ठेकेदारांपैकी एक असलेल्या ठेकेदाराकडून दरम्यान मंगल राघो नगर प्रभागातील ‘आझाद प्लंबर पासून पुढे लोकग्राम नाल्या पर्यंत‘ गेलेल्या मध्यम स्वरूपातील नाल्याची अर्धवट सफाई झाल्यामुळे हा नाला सद्या जराश्या पावसाने ओव्हर प्लो होत असल्याने या नाल्याच्या दुर्गंधी युक्त पाण्यातून नागरीकांना ये जा करावी लागत आहे. हा नाला पुन्हा फिरून पुर्ण क्षमतेने स्वच्छ न झाल्याने या पावसाळ्यात कोणत्याही क्षणी अती वृष्टी झाल्यास हेच दुर्गंधी युक्त गटाराचे पाणी या परिरातील नागरी वस्तीतील नागरीकांच्या घरात घुसून नागरीकांच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याच परिस्थितीही पालिकेचे ‘आयुक्त महोदय या ठेकेदाराला पैसे देणार का? असा प्रश्न स्थानिक सुज्ञ नागरीकांकडून विचारला जात आहे.