Home स्टोरी अरविंद शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे शहरात सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण शिबिराचे आयोजन…!

अरविंद शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे शहरात सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण शिबिराचे आयोजन…!

233

पुणे: पुणे शहर जिल्हा क्रीडा व युवा सेल यांच्यावतीने अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त व तसेच पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे शहर क्रीडा व युवा सेलच्या वतीने खडकी कॅन्टोन्मेंट परिसरात विविध शाळेमध्ये एक दिवसीय सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले. कर्नल भगत शाळा, मौलादीना उर्दू स्कूल, झाकीर हुसेन स्कूल येथेही शिबिर आयोजित करण्यात आले.

शालेय विद्यार्थी यांना सर्टिफिकेट वाटून सन्मान करण्यात आले. सर्व शालेय विद्यार्थिनी मुले व मुलींनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला. दोन्ही शाळेचे प्रिन्सिपल व त्यांचे स्टाफ या शिबिराच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होते. कार्यक्रमाचे आयोजन पुणे शहर क्रीडा व युवा सेलचे अध्यक्ष आशुतोष शिंदे, उपाध्यक्ष भिंगारे सर व त्यांचे सहकारी यांनी प्रशिक्षण दिले. खडकी ब्लॉक क्रीडा व युवा सेलचे अध्यक्ष जुबेर शेख खडकी कॅन्टोन्मेंट ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सेल्वाराज अंन्थोनि यांनी केले.