Home स्टोरी अमृत योजनेअंतर्गत कल्याण ग्रामिण मधील भाल गावात जलकुंभाची निर्मिती!

अमृत योजनेअंतर्गत कल्याण ग्रामिण मधील भाल गावात जलकुंभाची निर्मिती!

216

शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या हस्ते झाले भूमिपूजन.

कल्याण प्रतिनिधी:(आनंद गायकवाड): – श्री मलंग पट्टयातील पाण्याची टंचाई दूर होण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून अमृत योजने अंतर्गत विविध ठिकाणी जल वाहीन्या टाकणे तसेच जल कुंभांची निर्मिती करणे या कामाला गती आली असून याच कामांचा एक भाग म्हणून भाल गावातील टेकडीवर जलकुंभाची निर्मिती करण्यात येणार आहे. या जलकुंभ निर्मितीच्या कामाचे भूमिपूजन शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांचे हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीलाच लागून असलेल्या २७ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला होता, या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेउन कल्याण लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार आणि मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांचे सुपूत्र डॉ श्रीकांत शिंदे यांच्या विशेष प्रयत्नाने अमृत योजने अंतर्गत २७ गावातील पाणी समस्या संपुष्ठात आणण्यासाठी या परिसरात अमृत योजने अंतर्गत जलवाहिण्या टाकणे तसेच विविध ठिकाणी जल कुंभांची निर्मिती केली जात आहे. याच योजने अंतर्गत भाल गावातील टेकडीवर जलकुंभ उभारणीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. या कामाचे भूमिपूजन शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांचे हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले.

या समयी महेश गायकवाड यांनी सांगितले की, राज्यातील डबल इंजिनाचे सरकार हे अत्यंत जलद गतीने विकास कामे करत असल्याने विरोधकांच्या पायाखालची माती सरकत असून विरोधकांमध्ये दिवसेंदिवस अनेक वाचाळवीर निर्माण होत आहेत, या वाचाळविरांना शिंदे फडणवीस सरकार आपल्या कामातून उत्तर देत आहे, म्हणूनच विद्यमान सरकार आपला कार्यकाल पूर्ण करुन येणाऱ्या निवडणूकी नंतरही पुन्हा सत्तेवर येणार आहे. जनतेने विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नये असेही त्यांनी सांगितले. या भूमिपूजन सोहळ्या समयी अंबरनाथ तालुका प्रमुख-चैनू जाधव, अंकुश पाटील-उपतालुका प्रमुख, महेश पाटील- कल्याण ग्रामीण तालुका प्रमुख,गणेश म्हात्रे-शाखा प्रमुख, अशोक म्हात्रे-विभागप्रमुख, प्रशांत बोटे-शाखाप्रमुख, पप्पू टावरे, अनिल चिकणकर,गिरीश चिकणकर,प्रदीप मढवी, प्रल्हाद मुंढे, गजानन म्हात्रे, शरद म्हात्रे, दाजी, चिकणकर,जीवन मढवी आणि ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.