मसुरेत आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिन साजरा.
मसुरे प्रतिनिधी: अमली पदार्थांचे व्यसन हा एक असा आजार आहे जो तरुण पिढीवर सतत परिणाम करत आहे. तरुणांचा मोठा वर्ग दारू, सिगारेट, तंबाखू, अंमली पदार्थ यांसारख्या विषारी पदार्थांच्या आहारी जात आहे. त्यामुळे अमली पदार्थांच्या दुष्परिणामांची वेळीच माहिती असणे आवश्यक आहे. अंमली पदार्थांचा गैरवापर आणि बेकायदेशीर तस्करी विरुद्ध दरवर्षी २६ जून हा दिवस अंमली पदार्थांच्या दुरुपयोगमुक्त जगासाठी कृती आणि सहकार्य मजबूत करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो असे प्रतिपादन मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी येथे केले. आंतरराष्ट्रीय अंमलीपदार्थ विरोधी दिनानिमित्त आर. पी. बागवे हायस्कुल आणि एम जी बागवे तांत्रिक विद्यालय मसुरे येथील विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ सेवन केल्याने होणारे दुष्परिणाम व त्यापासून बचाव कसा करावा याबाबत मार्गदर्शन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी मुख्या. सौ अर्चना कोदे, सहा. शिक्षक रमेश पाताडे, सुनील बांदेकर, शशांक पिंगुळकर, एन. एस. जाधव, श्री घाटे, भरत ठाकूर, मसुरे पोलीस कॉन्स्टेबल विवेक फरांदे, मालवण पोलीस कॉन्स्टेबल कैलास ढोले, सौ सोनाली कोदे, विशाखा जाधव, सौ. आर्या भोगले, समीर नाईक, दयानंद पेडणेकर, भानुदास परब, अनिल मेस्त्री, चरणदास फुकट आदी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विध्यार्थी उपस्थित होते. स्वागत रमेश पाताडे तर आभार भरत ठाकूर यांनी मानले.