२५ मे वार्ता: २०२३ च्या अमरनाथ यात्रेला १ जुलै रोजी सुरूवात होणार आहे. अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांच्या १९ जूनपासून सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. अमरनाथ यात्रा १ जुलैपासून अनंतनाग जिल्ह्यातील ४८ किलोमीटरच्या नुनवान-पहलगाम मार्गावर असणाऱ्या गांदरबल जिल्ह्यातील बालटाल मार्गावर सुरू होणार आहे. या मार्गाची लांबी १४ किलोमिटर आहे. आरोग्य सेवा संचालक राजीव शर्मा यांनी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, श्री अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर १८ जूनपासून प्रसूती रजा आणि वैद्यकीय कारणासाठी दिलेल्या रजा वगळता डॉक्टर आणि पॅरामेडिकल कर्मचार्यांच्या इतर सर्व सर्व प्रकारच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत. दोन महिने सुरू असणाऱ्या यात्रेकरूंची पहिली तुकडी यात्रा सुरू होण्याच्या एक दिवस आधी जम्मू बेस कॅम्पवरून काश्मीरला रवाना होण्याची अपेक्षा आहे.
शर्मा यांनी मुख्य वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक आणि वैद्यकीय अधिकार्यांनी यात्रेच्या कालावधीत पुरेशा कर्मचार्यांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी डॉक्टर आणि पॅरामेडिक्सच्या कर्मचाऱ्यांच्या यात्रेच्या रजेचे अर्ज मंजूर करू नयेत किंवा पुढे पाठवू नयेत असे निर्देश दिले आहेत.
अमरनाथ यात्रेची सर्व्हिस्तर माहिती पुढीप्रमाणे आहे.
१) अमरनाथ यात्रा १ जुलै २०२३ पासून सुरु होईल आणि ही यात्रा ३१ ऑगस्टला संपेल. म्हणजेच अमरनाथची यात्रा ६२ दिवस चालणार आहे.
२) या यात्रेसाठी तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन नोंदणी करु शकताअमरनाथ यात्रेसाठी प्रवाशांना पूर्ण सुविधा देण्यात येणार आहेत.
३) घरापासून ते पिण्याचे पाणी, वीज आणि सुरक्षा व्यवस्था करण्यात येणार आहे.
३) अॅपच्या माध्यमातून प्रवाशांना हवामानाची माहितीही दिली जाईल.
४) श्री अमरनाथजी श्राईन बोर्डाद्वारे सकाळी आणि संध्याकाळी आरतीचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.
५) ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी तुम्हाला jksasb.nic.in वर जावे लागेल. याठिकाणी सर्वात आधी अर्ज भरा आणि नंतर तुमचा OTP टाका. या अर्जासह पुढे जा आणि तुम्हाला एसएमएसद्वारे माहिती पाठविली जाईल. यानंतर तुम्हाला पैसे भरावे लागतील. त्यानंतर तुम्हाला ट्रॅव्हल परमिट मिळेल, जे तुम्ही डाऊनलोड करु शकता. त्याचप्रमाणे तुम्ही ऑफलाईन रजिस्टेशन देखील करु शकता.
६) १३ ते ७५ वर्षे वयोगटातील व्यक्ती अमरनाथ यात्रेला जाऊ शकतात. त्याचप्रमाणे गर्भवती महिलांना प्रवास करण्याची परवानगी नाही.
७) जर तुम्ही ऑनलाईन नोंदणी केली तर तुम्हाला १०० ते २२० रुपये खर्च करावे लागतील. हेलिकॉप्टरच्या बुकिंगसाठी १३,००० रुपये मोजावे लागतील.