Home स्टोरी अभिनेते सरथ बाबू यांचे यांचे दुःखद निधन.

अभिनेते सरथ बाबू यांचे यांचे दुःखद निधन.

86

२२ मे वार्ता: विविध भाषांमधील अनेक चित्रपटांमध्ये मुख्य आणि सहाय्यक भूमिका साकारणारे अभिनेते सरथ बाबू यांचे सोमवारी हैदराबादमध्ये निधन झाले. ते काही काळ हैदराबादमधील रुग्णालयात ऍडमिट होते. ३ मे रोजी त्यांच्या मृत्यूबद्दलच्या अफवा पसरल्या होत्या, त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी हे वृत्त फेटाळून लावले आणि ते रिकव्हर होत असल्याची माहिती दिली. सोमवारी अभिनेत्याचे वयाच्या ७१ व्या वर्षी निधन झाले. सरथ बाबू यांना सेप्सिसचे निदान झाले होते, त्यामुळे त्यांचे अनेक अवयव निकामी झाले होते. त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर होती.सरथ बाबू यांची प्रकृती खालावल्याने त्यांना 20 एप्रिल रोजी बंगळुरूहून हैदराबादच्या एआयजी रुग्णालयात आणण्यात आले होते. मात्र नंतर त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर हलवावे लागले. सेप्सिसमुळे सरथ बाबू यांची किडनी, यकृत आणि फुफ्फुसावर परिणाम झाला होता. सेप्सिस हा एक गंभीर रोग आहे, ज्यामुळे अनेक अवयव निकामी होऊ शकतात. या आजारात जीवही जाऊ शकतो. अहवालानुसार, सरथ बाबूच्या संपूर्ण शरीरात सेप्सिस पसरला होता आणि अनेक अवयव निकामी झाल्यामुळे त्यांचे आज सोमवार दि.२२ मे रोजी दुःखद निधन झाले..