Home स्टोरी अभिनेते मंगल ढिल्लन यांचे दुःखद निधन.

अभिनेते मंगल ढिल्लन यांचे दुःखद निधन.

167

११ जून वार्ता: जुनून आणि बुनियाद फेम दिग्गज अभिनेते मंगल ढिल्लन यांचे आज रविवार दि.११ जून रोजी कर्करोगामुळे दुःखद निधन झाले. काही दिवसांपासून त्यांच्यावर लुधियानाच्या रुग्णालयात कर्करोगावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांनी रविवारी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी सोशल मीडियावर चाहत्यांना दिली.

दयावान, दिल तेरा आशिक, दलाल, विश्वात्मा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये अभिनेते मंगल ढिल्लन यांनी महत्वाची भूमिका साखारली होती. याशिवाय त्यांनी अनेक टीव्ही शोमध्येही काम केले होते. २०१७ मध्ये रिलीज झालेला ‘तुफान सिंग‘ हा त्यांचा शेवटचा चित्रपट आहे. .