सिंधुदुर्ग: गेली कित्येक वर्षे असंख्य बेरोजगार पुरुष व महिला पूर्णवेळ तर काहीजण पार्टटाईम नेटवर्क मार्केटिंगचे काम करतात. नेटवर्क मार्केटिंगद्वारे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अशातच स्वतःच्या स्वार्थासाठी समाजातील काही स्वयंघोषित पुढारी, विघ्नसंतोषी व नेटवर्क मार्केटिंग क्षेत्रात काहीही माहिती नसतांना फक्त फायद्यासाठी आलेले व्यक्ती नेटवर्क मार्केटिंग करणाऱ्या लोकांना खूप हीन दर्जाची वागणूक देत आहेत. असं निदर्शनास येत आहे. अशावेळी नेटवर्क मार्केटिंग क्षेत्रात काम करणाऱ्या काही लोकांना खूप मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागत आहे. अशातूनच काही लोकांकडून दमदाटी देणे, फायदा न झाल्यास गाड्या काढून घेणे, चेक लिहून घेणे असे अनेक प्रकार होत आहेत. अशा प्रकारे नेटवर्क मार्केटिंग मध्ये काम करणाऱ्या लोकांवर अन्याय होत असल्याचे दिसत आहे.
नेटवर्क मार्केटिंग क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींच्या या समस्या सोडवण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नाही. त्यामुळे नेटवर्क मार्केटिंग क्षेत्रात काम करणाऱ्या काही व्यक्तींनी आपले प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र येऊन “ELITE ASSOCIATION FOR RIGHTS OF NETWORKERS” हि संघटना तयार केली आहे. या संघटने द्वारे नेटवर्क मार्केटिंग क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक व्यक्तींना एकत्रित घेऊन त्यांच्या समस्या आणि न्याय हक्कासाठी काम करण्यात येणार आहे.
सध्या आपल्या देशात रोजगाराच्या विशेष संधी जसे नोकरी, व्यवसाय, व्यवसाय करण्यासाठी लगणारे भांडवल उपलब्ध नसल्यामुळे देशातील अनेक तरुण, तरुणी बेरोजगार आहेत. कित्येक जणांना तर एक वेळेस जेवण मिळणं ही अवघड आहे. सहाजिकच रोजगार उपलब्ध नसल्यामुळे देशातील आज अनेक तरुण-तरुणी अवैद्य धंद्यांकडे वळत आहेत, अर्थातच गुन्हेगारीकडे वळत आहेत. एकंदरीत ही परिस्थिती खूपच चिंतातायक आहे. असं असताना आपल्या देशातील अनेक तरुण-तरुणी नेटवर्क मार्केटिंग ला आपला उदरनिर्वाचं साधन समजून काम करत असतील तर काही चुकीचं म्हणता येणार नाही. नेटवर्क मार्केटिंग क्षेत्रामध्ये काम करून आज कित्येक तरुण-तरुणीने आपलं उत्तम करिअर घडवलेलं आहे
मात्र कित्येक वेळा काही विशेष कंपन्यांच्या चुकांमुळे आणि नेटवर्क मार्केटिंग कंपनीमध्ये चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्या काही लीडर्स मुळे अनेक व्यक्तींना आणि नेटवर्क मार्केटिंग मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. आता साहजिकच काही चुकीच्या कंपन्यांमुळे आणि नेटवर्क मार्केटिंग मध्ये चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्या काही व्यक्तींमुळे नेटवर्क मार्केटिंग क्षेत्रच चुकीचे आहे असं म्हणता येणार नाही. आणि जर नेटवर्क मार्केटींग व्यवसाय निवडून आपला व आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाह करणे चूक असेल तर शासनाने रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन द्यावा.
एखाद्या कंपनीमध्ये काम करत असतांना एखाद्या व्यक्तीला माहिती दिल्यानंतर ती व्यक्ती स्वेच्छेने व्यवसायात येते, कंपनीचे काम करते, त्यापासून फायदा मिळवते पण कंपनी अडचणीत आल्यावर नेटवर्करला जबाबदार धरते. नेटवर्क मार्केटिंग कंपनीत काम करणारा व्यक्ती आपल्या उत्पन्नांचा आयकर, टी.डी.एस., जी.एस.टी. इत्यादि सर्व रितसर कर भरणा केलेला असतो म्हणजेच येणारे संपूर्ण उत्पन्न हे कायदेशीर असते. जर हे बेकायदेशीर असेल तर सरकारने अशा कंपन्यांवरती कारवाई करणं व त्याची माहिती करणं गरजेचे आहे. जेणेकरुन नेटवर्क मार्केटिंग क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींची दिशाभूल होणार नाही. पण आयकर, टी.डी.एस., जी.एस.टी. इत्यादि सर्व रितसर कर घेऊन सुद्धा जेव्हा नेटवर्क मार्केटिंग मध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते तेव्हा सरकार याबाबत कोणताही निर्णय घेताना सध्यातरी दिसत नाही. म्हणूनच या सर्व गोष्टींचा विचार करून नेटवर्क मार्केटिंग क्षेत्रात काम करणाऱ्या काही व्यक्तींनी एकत्र येऊन आपले प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र येऊन “ELITE ASSOCIATION FOR RIGHTS OF NETWORKERS” हि संघटना तयार केली आहे
संघटनेचे काम पुढीलप्रमाणे:
१) नेटवर्क मार्केटिंग क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या न्याय हक्कासाठी संघटना कार्यरत राहणार आहे.
२) नेटवर्क मार्केटिंग क्षेत्रात चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्या कंपन्यांविरोधात आणि चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात संघटना कार्यरत राहणार आहे.
३) नेटवर्क मार्केटिंग क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना नाहक त्रास देणाऱ्याच्या विरोधात संघटना काम करणार आहे.
मार्केटिंग क्षेत्रात सर्वच कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या सर्व व्यक्तींनी एकत्रित येऊन या संघटनेमध्ये काम करून आपल्या न्याय हक्कांसाठी पुढे यावं. या संघटनेचे सभासद नोंदणी फॉर्म उपलब्ध असून खालील क्रमांकावर संपर्क करून फॉर्म भरून या संघटनेचे सभासद व्हावे. असे आवाहन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
संघटनेबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि संघटनेचा सभासद होण्यासाठी खालील संपर्क क्रमांकावर संपर्क करावा.
शैलेंद्र पेडणेकर – 9423320884
रौनक पटेल – 8446887318
संजय पवार – 9403881576
राजन पाठाडे – 9422076588
ओंकार बामणेकर – 9766 50863
नारायण गावकर – 9405575443