सिंधुदुर्ग प्रतिनिधी: बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार अफगाणिस्तानमध्ये प्रतिदिन १६७ बालकांचा मृत्यू होत आहे. हा आकडा केवळ अधिकृत असला, तरी यापेक्षा कितीतरी मोठ्या प्रमाणात बालकांचा मृत्यू होत असल्याची शक्यता यात वर्तवण्यात आली आहे. तसेच गेल्या २० मासांमध्ये अनेक मोठी रुग्णालये बंद झाली आहेत.

१. अफगाणिस्तानच्या घोर प्रांतातील सर्वांत चांगल्या रुग्णालयातील अनेक खोल्या आजारी मुलांनी भरलेल्या आहेत. एका खाटेवर किमान
२. मुलांना ठेवण्यात आले आहे. त्याच वेळी ६० मुलांसाठी वॉर्डात केवळ २ परिचारिकाच आहेत. ‘युनिसेफ’च्या म्हणण्यानुसार ही मुले गंभीर आजारांनी ग्रस्त आहेत.२. अफगाणिस्तानमध्ये आरोग्य सुविधांची अवस्था नेहमीच वाईट राहिली आहे. तालिबानचे सरकार येण्यापूर्वी परकीय निधीतून येथे उपचार सुविधा उभारल्या गेल्या; पण हेही वर्ष २०२१ नंतर थांबले.
३. यापूर्वी २१ वर्षे अफगाणिस्तानात सार्वजनिक आरोग्य सेवेसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले होते. वर्ष २०२१ मध्ये सत्ताबदल झाल्यापासून तालिबानच्या सरकारला आतापर्यंत मान्यता मिळालेली नाही. अशा परिस्थितीत देशासाठी पैसा वाटप करणे कठीण झाले आहे; मात्र काही स्वयंसेवी संस्था रुग्णालयातील कर्मचार्यांना पगार देण्यासाठी आणि आवश्यक सुविधा देण्यासाठी सातत्याने निधी गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत. या स्वयंसेवी संस्थांच्या म्हणण्यानुसार तालिबानचे महिलांवरील वाढते निर्बंध पाहता त्यांना मिळणारा निधीही लवकरच बंद होण्याची शक्यता आहे.







