Home स्टोरी अप्पासाहेब पटवर्धन यांच्या १२९ व्या जयंतीनिमित्त गोपुरी आश्रम येथे आयोजित कार्यक्रमात प्रा....

अप्पासाहेब पटवर्धन यांच्या १२९ व्या जयंतीनिमित्त गोपुरी आश्रम येथे आयोजित कार्यक्रमात प्रा. रुपेश पाटील मान्यवरांच्या हस्ते सन्मानित….

108

सावंतवाडी: येथील सुप्रसिद्ध व्याख्याते तथा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक तज्ज्ञ प्रा. रुपेश पाटील यांना कोकण गांधी अप्पासाहेब पटवर्धन यांच्या १२९ व्या जयंतीनिमित्त गोपुरी आश्रम येथे आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा खादी संघ, गोपुरी आश्रम वागदे तालुका कणकवली आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई, शाखा सिंधुदुर्ग आयोजित कोकण गांधी पूज्यनीय आप्पासाहेब पटवर्धन यांचा १२ वा जयंती उत्सव गोपुरी आश्रम येथे संपन्न झाला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते समाजात सातत्याने विधायक कार्य केले म्हणून तसेच युवकांना योग्य दिशा साठी प्रेरणादायी व्याख्यानातून प्रबोधन केले याबद्दल नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई शाखा सिंधुदुर्ग यांच्या वतीने प्रा. रुपेश पाटील यांना प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ व गुरापुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर कणकवली येथील ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, रोटरी क्लबचे सदस्य व सिंधुदुर्ग जिल्हा पेन्शनर असोसिएशनचे अध्यक्ष सिताराम उर्फ दादा कुडतरकर, गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर, डॉ. संजीव लिंगवत (वेंगुर्ला), विजय कालिदास सावंत (उपाध्यक्ष गोपुरी), ईर्शाद शेख (वेंगुर्ला), पत्रकार महेश सरनाईक, अर्पिता मुंबरकर, ॲड. मनीषा पाटील (संचालक – गोपुरी), अमोल भोगले (खजिनदार – गोपुरी आश्रम) मंगेश नेवगे (सचिव – गोपुरी), विजय चौकेकर (अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती), स्मिता नलावडे, माया रहाटे (सावंतवाडी), शितल मांजरेकर, विनायक उर्फ बाळू मेस्त्री (संचालक – गोपुरी) आदि उपस्थित होते.