Home स्टोरी अपघातग्रस्त विद्यार्थिनी हर्षदा निगवेकर हिला प्राथमिक शिक्षक भारती शाखा मालवणचा मदतीचा हात!

अपघातग्रस्त विद्यार्थिनी हर्षदा निगवेकर हिला प्राथमिक शिक्षक भारती शाखा मालवणचा मदतीचा हात!

444

२१ हजार रुपयांची मदत करत जपली सामाजिक बांधिलकी

 

मसुरे प्रतिनिधी:

 

जिल्हा परिषद शाळा करंजे कुंभारवाडी ता.कणकवली येथील इयत्ता दुसरीतील विद्यार्थिनी कु.हर्षदा निगवेकर हिचा अपघात झाल्याने तिच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली होती.तिच्या दोन्ही पायांवर मोठी शस्त्रक्रिया आवश्यक होती. परंतू सदर मुलीचे वडील हयात नसल्याने तसेच तिची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने तिच्या उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज होती.

तिचे शिक्षक यांनी ही गोष्ट महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा मालवणच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर संघटनेच्या वतीने २१ हजार रुपयांची मदत तिला डॉ. नवांगुळ हॉस्पिटल कुडाळ येथे सुपूर्द करण्यात आली.

यावेळी शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष श्री संतोष पाताडे, जिल्हा मुख्य संघटक श्री.विजय जाधव,जिल्हा प्रतिनिधी श्री रामचंद्र सातवसे,श्री.सिद्धार्थ नेरूरकर मालवण तालुका सचिव कृष्णा कालकुंद्रीकर, श्री.तुकाराम खिलारे, श्री. संतोष कोचरेकर, श्री.शिवाजी गोंदके उपस्थित होते.