Home स्टोरी अन्यथा जन आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल! श्री. केसरकर

अन्यथा जन आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल! श्री. केसरकर

94

सावंतवाडी प्रतिनिधी: – शालेय शिक्षण मंत्री , जिल्ह्याचे पालक मंत्री यांनी मोती तलावातील गाळ काढण्याचे आदेश देवून सुध्दा या ठिकाणी गाळ काढला जात नाही हे दुर्दैव, अशी खंत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते वसंत (उपाख्य अण्णा ) केसरकर यांनी व्यक्त केली आहे.शहरातील मोती तलाव सुंदर व्हावा, तसेच शहरात पाण्याचे दुर्भिक्ष्य भविष्यात जाणवू नये यासाठी तात्काळ याविषयी उपाययोजना करण्यात यावी, अन्यथा जनआंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही त्यांनी प्रांताधिकारी तथा प्रशासक प्रशांत पानवेकर यांना दिला आहे. यावेळी त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे.त्यात असे म्हटले आहे की, सावंतवाडीचे सौंदर्य असलेल्या मोती तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साठला आहे. काही ठिकाणी रेतीचे ढिगारे साठले आहेत. त्यामुळे पाण्याची समस्या निर्माण होणार आहे. दुसरीकडे या ठिकाणी सुरू करण्यात आलेले जलक्रीडा केंद्र बंद पडलेली आहेत. त्यामुळे गाळ काढल्यास अनेक प्रश्न सुटणार आहेत. त्यामुळे याकडे तात्काळ लक्ष घालून योग्य ती खबरदारी घेण्यात यावी, अन्यथा जन आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा श्री. केसरकर यांनी दिला आहे.