ओरोस (प्रतिनिधी): कालावल खाडी पात्रात सी-१ गटात वाळू काढण्यास मंजुरी असताना सी- २ व सी ३ गटामध्ये उत्खनन होत असल्या बाबत मसुरे कावावाडी येथील अनिल मसुरकर यांनी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना निवेदन देत लक्ष वेधले आहे.
निवेदनात उल्लेख केल्या नुसार, मसुरे गावातील कालावल खाडीपात्रात गट सी -१ मध्ये शासनाने ३ ब्रास क्षमतेच्या बोटींनी वाळू उपश्यासाठी मंजूरी दिलेली आहे. परंतू ठेकेदार हा गट क्र सी १ मध्ये वाळू उपसा न करता अनधिकृतपणे सी-२ व नजीक सी-३ मध्ये ६,७,९ ब्रास क्षमतेच्या होडयांनी चुकीच्या पद्धतीने वाळू उपसा करत आहे. ३० मार्च २०१३ रोजी सकाळी मसुरकर जुवा बेट येथील आमच्या मालकीच्या नारळाच्या झाडांचे नारळ काढण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी C3 गटामध्ये जुवा बेटा नजीक १० ते १२ होड्या वाळू काढत असल्याचे माझ्या निदर्शनास आले. त्यानंतर मी माझ्या पुतण्या सह छोटी होडी घेऊन वाळू काढणाऱ्या परप्रांतीय कामगारांना मंजूर असलेल्या गटामध्ये वाळू काढा असे सांगण्यास गेलो. त्यांच्या कडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने सदर ठिकाणी असलेले होड्यांचे नांगर दोरी कापून पाण्यात सोडुन दिले. यानंतर धमकावणारे फोन आपल्याला आल्याचे नमूद करत सदर फोन नंबर सुद्धा निवेदनात नमूद करण्यात आले आहेत.
मला धमकीचा फोन आला होता. त्यावेळी मी वाळू लिलाव धारकाने मंजूर गटामध्ये वाळू उत्तखनन करावे असे उत्तर दिले. यापूर्वी सुद्धा 23 मार्च व 27 मार्च रोजी बेकायदेशीर उपशा बद्दल ग्रामपंचायत, आचरा मंडळ अधिकारी, तहसीलदार मालवण
महसूल विभाग, बंदर अधिकारी यांना अर्ज देऊन लक्ष वेधले होते. मी अपंग जेष्ठ नागरिक असून संबंधित वाळू व्यावसाईक
धमकीचे फोन करून माझे व माझ्या कुटुंबाचे स्वास्थ बिघडवू पाहत आहेत. संबंधित वाळू व्यावसाईक कडून माझ्या जीवितास धोका असल्याने शासनाने याबाबत तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे.
यापूर्वी कालावल खाडीपात्रात वाळू लिलाव साठी कुठल्या गटात व कोणाला मंजुरी देण्यात आली याबाबत माहिती
मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ४ जानेवारी 2023 रोजी माहिती अधिकारात अर्ज दिला होता. त्याबाबत मला माहिती प्राप्त होणे आवश्यक आहे. अनेक विभागांना अर्ज देऊन सुद्धा कोणतीही कारवाई झाली नसल्याचे अनिल मसुरकर यांनी निवेदनाद्वारे नाराजी व्यक्त केली आहे.