Home स्टोरी अनंतनागमध्ये अद्यापही चकमक चालूच!

अनंतनागमध्ये अद्यापही चकमक चालूच!

91

जम्मू-काश्मीर:  येथील कोकोरनाग भागात गेल्या ३ दिवसांपासून आतंकवाद्यांशी चालू असणारी चकमक अद्यापही चालू आहे. येथील डोंगरामध्ये २-३ आतंकवादी अद्यापही लपलेले असून त्यांना पकडण्यासाठी किंवा ठार मारण्यासाठी सैन्याकडून प्रयत्न केले जात आहेत. यासाठी ड्रोनचा वापर करण्यात येत असून आता रॉकेट लाँचरचाही वापर करण्यात येणार आहे.या चकमकीत भारतीय सैन्याचे एक कर्नल आणि मेजर, तर जम्मू-काश्मीर पोलिसांचे एक उपायुक्त वीरगतीला प्राप्त झाले आहेत. यासह २ सैनिकांनाही वीरमरण आले आहे.