Home स्टोरी अजित पवार गटातील आमदारांचे सदस्‍यत्‍व रहित करण्‍याची सभापतींकडे मागणी !

अजित पवार गटातील आमदारांचे सदस्‍यत्‍व रहित करण्‍याची सभापतींकडे मागणी !

101

मुंबई: उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांच्‍या गटातील आमदारांचे सदस्‍यत्‍व रहित करण्‍याची मागणी राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या शरद पवार गटाने विधान परिषदेच्‍या सभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांच्‍याकडे केली आहे. यामध्‍ये जयंत पाटील (शरद पवार गट) यांनी केलेल्‍या अर्जामध्‍ये अनिकेत तटकरे, अमोल मिटकरी, विक्रम काळे आणि सतीश चव्‍हाण यांचे, तर जितेंद्र आव्‍हाड (शरद पवार गट) यांनी केलेल्‍या अर्जामध्‍ये रामराजे नाईक निंबाळकर यांचे सदस्‍यत्‍व रहित करण्‍याची मागणी आहे. अजित पवार यांसह या आमदारांनी सरकारला पाठिंबा दिल्‍यामुळे राष्‍ट्रवादी पक्षाकडून (शरद पवार गट) ही मागणी करण्‍यात आली आहे.