Home स्टोरी अग्निवीर रेणुका राणेचा मुणगे येथे सन्मान!

अग्निवीर रेणुका राणेचा मुणगे येथे सन्मान!

92

मसुरे प्रतिनिधी:

 

हिंदळे ता.देवगड येथील  सुकन्या. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली “अग्निवीर ” कु.रेणुका विलास राणे हिची भारतीय सैन्य दलात निवड झाल्या बद्दल मुणगे सरपंच सौ साक्षी गुरव याच्या हस्ते  देवी भगवती मंदिर येथे सत्कार करण्यात आला.

हिंदळे ता.देवगड गावची सुकन्या आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची पहिली “अग्नीवीर ” कु. रेणुका विलास राणे हिचे बेंगलोर येथील प्रशिक्षण यशस्विरीत्या पूर्ण झाले आहे.आणि आता तिची भारतीय सैन्यात निवड झाली असून आसाम येथे नियुक्ती झालेली आहे. ही बाब  हिंदळे गावाच्या  तसेच देवगड तालुक्याच्या दृष्टीने  अत्यंत अभिमानाची आहे. तिच्या या प्रचंड यशाचे गमक तिची अपार मेहनत, ग्रामदैवत श्री काळभैरव आणि देवी भगवती यांचे आशिर्वाद आणि तिच्या आई – वडिलांचे पाठबळ हेच आहे. कु. रेणुका हिचे अभिनंदन आणि कौतुक करावे तितके थोडेच आहे. कु.रेणुका हि सैन्य दलात दाखल होण्यासाठी जाणार असून त्यानिमित्ताने मुणगे येथील प्रसिद्ध देवस्थान देवी भगवतीच्या दर्शनासाठी आली असताना मुणगे सरपंच सौ साक्षी गुरव यानी कु.रेणुका हिचा गुलाब पुष्प व श्रीफळ देऊन सन्मान केला,  तिला तिच्या पुढील वाटचालीसाठी श्री देवी भगवती आणि  श्री देव काळभैरवाने अशीच कृपादृष्टी ठेवावी आणि तिची उत्तरोत्तर प्रगती करावीत अशी प्रार्थना करत कु. रेणुका हिला तिच्या पुढील उज्ज्वल भविष्यासाठी सरपंच सौ. साक्षी गुरव यानी हार्दिक शुभेच्छा दिल्या.यावेळी देवी भगवती देवस्थानचे विश्वस्त कृष्णा सावंत, अनिल धुवाळी, प्रमोद वळंजू, विनोद सावंत,सुनील सावंत, अमित सावंत आदी उपस्थित होते. कु.रेणुका राणे हिचे आजोळ मुणगे कारिवणेवाडी येथील पाडावे यांचे घरी आहे.