देश विदेश: इस्रायलकडून गाझा पट्टीत सातत्याने बॉम्ब हल्ले सुरु आहेत. इस्रायलयाने हमासचे अनेक तळ उद्धवस्त केले आहेत. त्यामुळे आता हमास बंधकांच्या सुटकेसाठी तयार आहे. हमासने इस्रायलसमोर बॉम्ब हल्ले बंद करण्याची मागणी केलीय आहे. हमासच्या एका नेत्याने न्यूज एजन्सीशी बोलताना हि माहिती दिली आहे. गाझा पट्टीत इस्रायली लष्कराने आपली कारवाई थांबवली, तर तासाभरात सर्व बंधकांची सुटका करु, असं हमासच्या या नेत्याने म्हटलं आहे.
गाझामधील रुग्णालयावर काल भीषण हल्ला झाला. यात ५०० नागरिक ठार झाले. त्यानंतर हमासकडून ओलिसांच्या सुटकेसाठी लगेच ही अट ठेवण्यात आली. इस्रायलने हॉस्पिटलवरील रॉ़केट हल्ल्याचा आरोप फेटाळून लावलाय. इस्लामिक जिहाद दहशतवादी संघटनेने डागलेल रॉकेटच या हॉस्पिटलवर पडलं असं इस्रायलच म्हणणं आहे.