सावंतवाडी: गेले दहा-बारा दिवस असनिये गावांमध्ये बस सेवा अर्धवट सुरू होती गावाच्या बाहेरूनच चार किलोमीटर अलीकडूनच बस परतून जात असे याचा फटका विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना बसला होता. असनिये गावामध्ये जाणारा रस्ता हा पूर्णपणे खराब खड्डे युक्त झाल्या कारणाने तेथील सरपंच व ग्रामस्थांनी अंग मेहनत घेऊन खड्डे बुजवून सदर रस्ता दुरुस्ती करण्याचे काम हाती घेऊन पूर्ण केले व याची कल्पना त्यांनी आगार व्यवस्थापना देखील दिली होती परंतु रस्ता दुरुस्ती झाल्याची खात्री करूनच बस सेवा सुरू करण्यात येईल असे आश्वासन एसटी आगार व्यवस्थापकाकडून मिळाले होते. रस्ता दुरुस्ती करून सुद्धा बस सेवा सुरू होत नसल्याकारणाने ग्रामस्थांनी सावंतवाडी आगार प्रमुखांना निवेदन देखील दिल होतं परंतु त्यामागे कुठच्याही प्रकारच्या हालचाली होत नसल्याकारणाने सरपंच व ग्रामस्थांनी बबन साळगावकर यांची भेट घेतली. त्यावेळी ग्रामस्थांना सोबत घेऊन साळगावकर यांनी आगार प्रमुखांशी चर्चा करून दोन दिवसात असनिये गावामध्ये बस सुरू करा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला होता. त्यानंतर आगार व्यवस्थापन कडून उद्यापासून बस सेवा पुन्हा सुरळीत सुरू करू असे आश्वासन दिले होते. परंतु डेपो मॅनेजर यांनी सागावकरांना एक विनंती केली होती की असनिये व घारपी गावामध्ये जाणारा रस्ता कित्येक वर्ष खराब झालेला आहे त्याचप्रमाणे रस्त्यावरील झाडांच्या फांद्या रस्त्यावर झुकल्या करण्याने त्या बसच्या काचांवर आपटतात आणि बसच्या काचा फुटून बस नुकसान होतं याकरिता देखील आपण ग्रामस्थांना सूचना करून त्यासाठी उपाययोजना करावीं अशी विनंती केली. त्यावेळी साळगावकर यांनी असनिये गावातील सरपंच यांना फोन लावून याबाबत तातडीने कार्यवाही करा व बस आगारांना सहकार्य करा असे सुचवले. आणि आज पासून असनिये गावामध्ये बस सेवा पूर्वस्थितीमध्ये सुरू झाली आहे. यासाठी बबन साळगावकर यांनी डेपो मॅनेजर विशाल शेवाळे यांचे आभार मानले. त्याचप्रमाणे असनिये गावातील सरपंच व ग्रामस्थांनी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचे खूप खूप आभार मानले आहे. यासाठी राकेश सावंत व सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांनी मेहनत घेतली.