गोवा प्रतिनिधी: फोंडा, गोवा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवलेनगरी) – ‘सांप्रत काळ समस्त जगासाठी अतिशय वाईट काळ म्हणजेच आपत्काळ आहे. युद्धाचे सावट डोक्यावर येऊन ठेपले आहे. या घनघोर आपत्काळात शत्रू केवळ शस्रास्रांनीच नव्हे, तर आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे रोगजंतूंच्या माध्यमातूनही आपल्यावर आक्रमण करू शकतो. या न पाहिलेल्या नवीन आपत्तींना तोंड देण्यासाठी सर्वांचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक बळ चांगले असणे आवश्यक आहे. ‘सर्वांचे कल्याण व्हावे’, या उद्देशाने या ‘श्री महाधन्वन्तरि यागा’चे प्रयोजन आहे. ‘लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु ।’ म्हणजे ‘सर्व लोक सुखी होवोत’, याउद्देशाने सनातन संस्था आयोजित ऐतिहासिक आरि भव्य अशा ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या ठिकाणी ‘श्री महाधन्वन्तरि याग’ करण्यात आला. या वेळी देशविदेशातील २० हजारांहून अधिक साधक आणि हिंदू धर्मप्रेमींची उपस्थिती होती.

या महायागासाठी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्यासह त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, गोव्याचे आरोग्यमंत्री श्री. विश्वजित राणे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी आमदार सौ. दिव्या विश्वजित राणे यांच्या अनेक संत-महंत, प्रतिष्ठित यांची विशेष उपस्थिती होती. पुरोहितांनी म्हटलेल्या मंत्रघोषामुळे संपूर्ण वातावरण भक्तीमय आणि चैतन्यमय झाले होते.

या संदर्भात सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक म्हणाले, ‘‘शिवागम विद्यानिधी आगमाचार्य श्री. अरुणकुमार गुरुमूर्ती आणि गुरुमूर्ती शिवाचार्य यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या यागात ६१ दांपत्य यजमान म्हणून सहभागी झाली होती. जेव्हा भगवंताचे हजारो भक्त आणि वेदब्राह्मण एकत्रित येऊन यज्ञ करतात, तेव्हा तो यज्ञ ‘महायज्ञ’ बनतो. त्यामुळे या महोत्सवात हजारो भक्त, भाविक एकत्रित येऊन झालेला हा ‘धन्वन्तरि याग’ ‘श्री महाधन्वन्तरि याग’ बनला आहे. या यज्ञाचा संकल्प केवळ व्यष्टी किंवा कौटुंबिक या स्तरांवर मर्यादित नसून तो विश्वव्यापक संकल्प आहे.’’
या कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी व थेट प्रक्षेपणासाठी भेट द्या – SanatanRashtraShankhnad.in