सावंतवाडी प्रतिनिधी: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विकास भालचंद्र सावंत यांचे १५ जुलै रोजी दुःखद निधन झाले. अखिल भारतीय मराठा महासंघ सावंतवाडी यांच्या माध्यमातून कै. विकास भाई सावंत यांच्या दुःखद निधनाची शोकसभा सोमवार दिनांक २१ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५:०० वाजता राणी पार्वती देवी हायस्कूल च्या हॉल मध्ये ठेवण्यात आली आहे. सदर शोकसभेला विकास भाईंवर प्रेम करणाऱ्या सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघ सावंतवाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.