मसुरे प्रतिनिधी:(पेडणेकर): अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरातश्रावण अधिक मास निमीत्त आयोजीत३ दिवसीय दत्तयाग दिनांक २५ जुलै ते दिनांक २७ जुलै अखेर मोठ्या भक्तीभावाने संपन्न झाला. इंगळे कुटुंबीयांच्या तिसऱ्या पिढीचे मानकरी स्वामी सेवक व मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे, रूपाली इंगळे, प्रथमेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत चोळप्पा महाराजांचे वंशज प.पू. मोहनराव पुजारी यांच्या अधिपत्त्याखाली व प.पू.मंदार महाराज पुजारी व मुग्धा पुजारी, मोहित महाराज पुजारी यांच्या हस्ते बदलापूरचे प्रसाद गुरुजी व ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चारात हा दत्तयाग संपन्न झाला. दिनांक २५ जुलै रोजी सकाळी ७ : ३० ते ८:३० या वेळेत गणपती कुलेष्ट देवता, वास्तू देवता, ग्रामदेवता आवाहन, सकाळी ८ : ३० ते ९ : ३० या वेळेत आचमन, प्राणायाम, मंगलाचरण, देवता गुरुवंदन शांतीपाठ, प्रायश्चित संकल्प, गोमाता पूजन, विष्णुपूजन, पंचगव्य प्राशन, यज्ञोपवित धारण, यथाशक्ती गोदान संकल्प, याग संकल्प, सकाळी ९ : ३० ते ११ या वेळेत गणपती पूजन, पुण्याहवाचन, मातृका पूजन, वसोर्धरा पूजन, नांदीश्राद्ध, सकाळी ११ ते ११ : ३० या वेळेत आचार्यादी, ऋत्वीज्वरण, ब्राह्मण पूजन, दिग्रक्षण, मंडप शुद्धी, कुंड पूजन, सकाळी ११ : ३० ते २ : ३० या वेळेत अग्निमंथन, अग्नी स्थापना, वास्तू योगिनी, क्षेत्रपाल, दत्तभद्र, मंडल देवता स्थापन, देवता अभिषेक पूजन, दुपारी ४ ते ६ : ३० या वेळेत नवग्रहमंडल स्थापन, रुद्रकलश स्थापन, नवग्रह होम, सायंपूजन आरती, दिनांक दि.२६ जुलै रोजी सकाळी ८ ते ११ : ३० या वेळेत मंगलाचरण, शांतीपाठ, पीठमंडल, देवता प्रात पूजन, दत्तात्रेय स्वामी आवाहित देवता अभिषेक पूजन, पुजन अर्चन, ब्राम्हण पुजन, दुपारी ३ : ३० ते ६ : ३० या वेळेत नवग्रह हवन, प्रदान दत्तमाला मंत्र हवन, सायं पूजन, आरती, दिनांक २७ जुलै रोजी सकाळी ७ : ३० ते दुपारी १ : ३० या वेळेत मंगलाचरण, शांतीपाठ, पीठमंडल, देवता प्रातः पूजन, दत्तात्रय स्वामी आवाहित देवता अभिषेक पूजन अर्चन, स्थापित देवता होम, उत्तरांग पूजन, दुपारी १२ : ३२ ते १२ : ५७ या वेळेत अभिजीत मुहूर्त, लाभ योग, आरती आशीर्वाद, ब्राह्मण पूजन, कर्म समापन, पूर्णाहुती इत्यादी विधी संपन्न होऊन हा दत्त याग सोहळा संपन्न झाला.


याप्रसंगी बोलताना मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी यंदा समाधानकारक पाऊस व्हावे यासाठी हा दत्तयाग सोहळा आयोजित करून संपन्न झालेला आहे.वटवृक्ष मंदिरात संपन्न झालेल्या या दत्तयाग प्रसंगी वटवृक्ष मंदिर गाभारा परिसरास आकर्षक फुलांच्या सजावटीत सनईच्या मंजूळ स्वर आविष्काराने अत्यंत मंगलमय प्रसन्नपूर्वक भक्तिमय वातावरणातील हा सोहळा उपस्थित भाविक याची देही याची डोळा अनुभवून धन्य झाले असल्याचे मनोगत व्यक्त केले. हा दत्तयाग सोहळा परिपूर्ण होण्यासाठी मुंबईचे स्वामीभक्त राजू गवाणकर, साईप्रसाद सामंत, प्रफुल्ल सावंत, नाना वेदक, पेंडुरकर काका, निलेश कुळकर्णी, अजीत तासगावकर आदींनी परिश्रम घेतले. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, श्रीशैल गवंडी, श्रीकांत मलवे, गिरीश पवार, ऋषिकेश लोणारी आदीसह भावीक भक्त उपस्थित होते.
