Home Uncategorized अंध मुलांच्या सहलीचे सावंतवाडीत सामाजिक बांधिलकीकडून स्वागत…

अंध मुलांच्या सहलीचे सावंतवाडीत सामाजिक बांधिलकीकडून स्वागत…

136

आज शनिवार दिनांक २५ फेब्रुवारी २०२३ रोजी पताशीबाई रतनचंद मानव कल्याण ट्रस्ट पुणे येथून पन्नास अंध मुलांची सहल मालवणच्या समुद्राचा व किल्ल्याचा आनंद घेऊन सावंतवाडी गार्डनमध्ये दाखल झाली. त्यावेळी ज्येष्ठ साहित्यकार विठ्ठल कदम सर व शिक्षक मंडळी तसेच सामाजिक बांधिलकीच्या टीमने मुलांचे सावंतवाडी शहरांमध्ये सहर्ष स्वागत केले. विठ्ठल कदम व दत्तकुमार फोंडेकर यांनी मुलांच्या चहापाण्याची व्यवस्था केली, तर सामाजिक बांधिलकीने मुलांना आईस्क्रीम चॉकलेट दिली. सामाजिक बांधिलकीची टीम व सावंतवाडीतील शिक्षक मंडळी मुलांच्या आनंदामध्ये सहभागी झाले होते. मुलांनी छान अशी गाणी गात गार्डन मधील वातावरण आनंदमय केले. १४ ते १६ वयोगटातील अंध मुलांमध्ये आत्मविश्वास आणि त्यांचे सहज रित्या वावरण्याची पद्धत प्रत्येकाला आश्चर्यचकित करणारी होती. मुलांनी सावंतवाडीचे मोती तलाव, गार्डन, राजवाडा व उभा बाजार येथील लाकडी खेळणी स्पर्शाने पाहण्याचा आनंद त्यांनी उपभोगला. याप्रसंगी अंध मुलांच्या शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी वर्ग व शाळेची मुलं तसेच शिक्षक विठ्ठल कदम सर, कुमार फोंडेकर रामचंद्र दाभोळकर, विनया कदम, दीक्षा फोंडेकर व मित्र मंडळ उपस्थित होते. तर सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, संजय पेडणेकर, समीरा खालील, हेलन निबरे व प्रदीप ढोरे उपस्थित होते.