Home स्टोरी ५८ लाख बालके, पोषण आहारापासून वंचित तसेच १० लाख गर्भवती महिला आणि...

५८ लाख बालके, पोषण आहारापासून वंचित तसेच १० लाख गर्भवती महिला आणि स्‍तनदा माता यांवर परिणाम…!

140

११ जानेवारी वार्ता: गेल्‍या मासाहून अधिक काळ चालू असलेल्‍या अंगणवाडी सेविकांच्‍या संपाचा फटका अंगणवाड्यांमध्‍ये पोषण आहारापासून वंचित असलेल्‍या ५८ लाख बालकांना बसला आहे. जवळपास १० लाख गर्भवती महिला आणि स्‍तनदा माता यांनाही याचा परिणाम भोगावा लागत आहे. पुरेशा पोषण आहाराअभावी लाखो बालके कुपोषणाच्‍या विळख्‍यात सापडण्‍याची शक्‍यता निर्माण झाली आहे. तीव्र कुपोषित बालकांची संख्‍या वाढून (नवीन शासकीय भाषेत तीव्र अल्‍प वजनाची बालके) ७८ सहस्र ४३७ एवढी झाली आहे. मानधनवाढीच्‍या संदर्भात अंगणवाडी सेविकांनी ४ डिसेंबरपासून राज्‍यव्‍यापी कामबंद आंदोलन पुकारले आहे.