Home राजकारण २०१९ सालचा सत्ताबद्दल देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व मी घडवून आणला होता!...

२०१९ सालचा सत्ताबद्दल देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व मी घडवून आणला होता! आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत

77

राज्यातील २०१९ सालचा सत्ताबद्दल देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व मी घडवून आणला होता. असा गौप्यस्फोट राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी केला आहे. नरेंद्र मोदी व अमीत शहा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडनुका लढलो. जनतेने कल ही आमच्या बाजुने दिला. मात्र उध्दव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. ते सरकार पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व मी आमदारांचे कॉन्सलिंग करण्यासाठी दिडशे बैठका घेतल्या असंहि डॉ.तानाजी सावंत यांनी सांगितल आहे. उध्दव ठाकरे यांनी मराठवाड्याच्या हक्काच्या 25 टीएमसी पाणायासंदर्भात माझ्या सांगण्यावरून बैठक लावत पाणी मिळवुन देण्यासाठी प्रयत्न केल्याचे ते म्हणाले. आता तानाजी सावंत यांच्या या वक्तव्याने शिवसेना, भाजप जवळीकता वाढणार का याच्याही चर्चा सुरू झाल्या आहेत. आरोग्यमंञी सावंत धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथे बोलत होते.

सावंत यांच्या या गौप्यस्फोटाने राज्यातील सत्ता बदलात माझा काही हात नसल्याचा देवेंद्र फडणवीस यांनी या आधी सांगितल होत. पण सावंत यांनी सत्ताबदलात फडणवीस यांचा हात असल्याचा सांगितल्याने यापूर्वी फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावर संशय निर्माण झाला आहे.