Home स्टोरी १ एप्रिलपासून जोतिबा देवस्‍थान (कोल्‍हापूर) येथील यात्रेस प्रारंभ !

१ एप्रिलपासून जोतिबा देवस्‍थान (कोल्‍हापूर) येथील यात्रेस प्रारंभ !

93

कोल्‍हापूर:– दख्‍खनचा राजा म्‍हणून प्रसिद्ध असलेल्‍या श्री जोतिबा देवस्‍थान येथील जोतिबा देवाच्‍या यात्रेस १ एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. १ एप्रिलला धार्मिक विधी आणि पालखी प्रदक्षिणा यांना प्रारंभ होत आहे. मानाच्‍या सासनकाठ्या हे यात्रेचे प्रमुख आकर्षण असते. या सासनकाठ्याही लवकरच कोल्‍हापुरात येण्‍यास प्रारंभ होईल. यंदाच्‍या वर्षी ‘आर्.के. मेहता ट्रस्‍ट’च्‍या वतीने ४ ते ६ एप्रिल या कालावधीत अन्‍नछत्राचे आयोजन करण्‍यात आले आहे. हे अन्‍नछत्र जोतिबा डोंगरावरील जिल्‍हा परिषदेच्‍या जुन्‍या शासकीय विश्रामधाम येथे चालू असणार आहे. बुधवार, ५ एप्रिल या यात्रेच्‍या मुख्‍य दिवशी पहाटे ५ वाजता शासकीय महापूजा होईल, तर दुपारी १२ वाजता परंपरेनुसार दुपारी १२ वाजता पालकमंत्र्यांच्‍या हस्‍ते मानाच्‍या सासनकाठीचे पूजन होईल.


पूजनानंतर सासनकाठ्या यमाई मंदिराकडे रवाना होतात. यानंतर पुढच्‍या काही दिवसांमध्‍ये पाकाळणी, पालखी सोहळा होईल. पाकाळणीच्‍या निमित्ताने जोतिबा देवाची खडी पूजा बांधण्‍यात येते. पालखी सोहळा १६ एप्रिलपर्यंत चालू राहील. पश्‍चिम महाराष्‍ट्र देवस्‍थान व्‍यवस्‍थापन समितीच्‍या वतीनेही यात्रेची सिद्धता करण्‍यात येत असून दर्शनरांगा, वाहनतळाची सुविधा, तसेच अन्‍नछत्राची व्‍यवस्‍था करण्‍यात येत आहे.