Home स्टोरी होळीच्या मुहूर्तावर कलंबिस्त गणशेळवाडी येथील श्री देव धावगिरा देवस्थान येथे नव्याने देवस्थानच्या...

होळीच्या मुहूर्तावर कलंबिस्त गणशेळवाडी येथील श्री देव धावगिरा देवस्थान येथे नव्याने देवस्थानच्या नावाच्या फलकाचे अनावरण.

153

सावंतवाडी प्रतिनिधी: कलंबिस्त गणशेळवाडी येथील श्री देव धावगिरा देवस्थान येथे नव्याने देवस्थानच्या नावे फलक लावण्यात आला आहे. या फलका चे अनावरण शिव साम्राज्य प्रतिष्ठानच्या पदाधिकारी, कार्यकर्ते ज्येष्ठ ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले. या वर्षी होळी सणाच्या पहिल्या दिवशी देवस्थान येथे श्री धावगीरा देवस्थानचा जयजयकार करून होळी सण जल्लोषात साजरा करण्यात आला.

यावेळी कलंबिस्त पंचक्रोशीतील अनेक भक्तगण यांनी आपला नवस फेडण्यासाठी गर्दी केली होती. श्री धावगिरा देवस्थान येथे काल सकाळपासून पूजाअर्चा तसेच दुपारी तीन नंतर होळी उत्सव सामाजिक अध्यात्मिक शांततेचे प्रतीक म्हणून ह्या भागातील शेतकरी वर्गाने एकत्र येऊन होळी सण साजरा करण्याचे प्रथा आहे. त्यानुसार पारंपारिक रूढी रिवाजानुसार अध्यात्मिक वातावरणात होळी जल्लोषात साजरी करण्यात आली. यावेळी शिव साम्राज्य प्रतिष्ठान ने संपूर्ण परिसरात भक्तांच्या सेवेसाठी फलक लावले होते. तर सर्वत्र वातावरण भक्तीमय झाले होते. संपूर्ण रस्त्यावर रांगोळी, भगवे पताके लावून वातावरण भक्तीमय करण्यात आले होते.

होळी उभारल्यानंतर श्री. धावगीरा देवस्थान येथे महिला यांनी पूजा अर्चा केली. त्यानंतर दरवर्षीप्रमाणे नवसाचे श्रीफळ ठेवण्यात आले. त्यानंतर काहीजणांनी देवाला पाच नारळाचे तोरण तसेच अन्य नवस केले होते ते सर्व नवस आज फेडण्यात आले.  काही जणांनी नव्याने नवसही केले. शेकडोच्या संख्येने भक्तगण उपस्थित होते अलोट गर्दी दर्शनासाठी झाली होती.

यावेळी जेष्ठ ग्रामस्थ विष्णू सावंत, एडवोकेट संतोष सावंत, अनिल सावंत, नारायण सावंत, राजू सावंत, रवींद्र जंगम, महादेव जंगम,आप्पाजी देसाई, अमित देसाई, दीपक देसाई, विलास बिडये, राजू बिडये, श्री कविटकर,  शिरीष पवार,  बापू पवार, शत्रुघन मेस्त्री,  पांडुरंग राऊळ,  पांडुरंग मेस्त्री, ग्रामपंचायत सदस्य शेखर मेस्त्री, प्रशांत मेस्त्री, प्रवीण मेस्त्री, शिव साम्राज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष सिद्धेश सावंत, स्वप्निल सावंत, सचिव रोहन सावंत,विराज सावंत ओमकार सावंत, विकी सावंत, प्रकाश मेस्त्री, गुरु मेस्त्री, अंकुश मेस्त्री, अंकिता सावंत, श्रद्धा सावंत, काव्य सावंत, जीविका सावंत, तनिष्का देसाई, आर्यन देसाई, मेघराज जंगम आदी उपस्थित होते.

शिव साम्राज्य प्रतिष्ठान तर्फे या भागात सामाजिक सांस्कृतिक,अध्यात्मिक, कृषी, पशुसंवर्धन असे विविध उपक्रम राबवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या भागाला एक अध्यात्मिक पर्यटन केंद्र बनवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. असा संकल्प करण्यात आला.