Home स्टोरी हृदयरोगग्रस्त प्रवर्गातील मुलांसाठी १ ऑगस्ट रोजी कुडाळ येथे मोफत 2D इको तपासणी...

हृदयरोगग्रस्त प्रवर्गातील मुलांसाठी १ ऑगस्ट रोजी कुडाळ येथे मोफत 2D इको तपासणी शिबीर!

87

कुडाळ प्रतिनिधी: जन्मजात पालकापासून 18 वर्ष वयो गटातील हृदयरोगग्रस्त प्रवर्गातील मुलांसाठी 2D इको तपासणी शिबीर दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हा महिला व बाल रुग्णालय, कुडाळ येथे आयोजित करणेत आलेले आहे.सदर शिबीरामध्ये हृदयरोग निदान झालेल्या बालकांना राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्ग सामंजस्य करार झालेल्या बालाजी हॉस्पिटल, मुंबई, रहेजा हॉस्पिटल, मुंबई, कोकिलाबेन हॉस्पिटल मुंबई , फोर्टिस हॉस्पिटल मुंबई, अपोलो हॉस्पिटल मुंबई, अँपल सरस्वती कोल्हापूर, ज्युपिटर हॉस्पिटल पूणे या शासन मान्यता प्राप्त रुग्णालयात संदर्भीत करून त्यांचेवर मोफत उपचार करणेत येणार आहेत. तरी हृदयरोग ग्रस्त प्रवर्गातील जास्तीत जास्त बालकांनी सदर शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

अधिक माहिती साठी जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक श्री राजेश पारधी 9422373188 यांच्याशी संपर्क साधावा.