Home राजकारण हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि निवडणुकांना सामोरे जा! संजय राऊतांचे एकनाथ...

हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि निवडणुकांना सामोरे जा! संजय राऊतांचे एकनाथ शिंदेना आवाहन

103

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टिक करत त्यांना निवडणूक लढवण्याचे आवाहन दिले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना चोरली आहे. त्यांनी स्वतः पक्ष स्थापन करून त्याचे पाच आमदार निवडून दाखवा. एकनाथ शिंदे, राज ठाकरे, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरेंवर टीका केल्याशिवाय शांत बसू शकत नाहीत. त्यामुळेच उद्धव ठाकरेंचे नेतृत्त्व किती मोठे आहे हे समजते. निवडणूक आयोगाशी सौदा करून एकनाथ शिंदे यांनी पक्ष आणि चिन्ह मिळवले, असा आरोप संजय राऊत यांनी केला. विरोधक नष्ट करायचे हेच चालले आहे. एकनाथ शिंदे विधानसभेत म्हणाले की आम्हाला खोके, मिंधे का म्हणता? हा प्रश्न एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या मनाला विचारला पाहिजे. हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि निवडणुकांना सामोरे जा. हिंमत असेल तर आणि तुम्ही सच्चे असाल किंवा जे काही बंड वगैरे केले म्हणत असाल ते खरे असेल तर राजीनामे द्या. आत्ता निवडणुका घ्या तेव्हा जनताच दाखवून देईल की, खरी शिवसेना कोणती आणि राजीनामे देऊन निवडणुकीला सामोरे जा, असे आव्हान संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले.