Home क्राईम हिंदू मुलासोबत फिरते म्हणून एका मुस्लिम मुलीला मारहाण

हिंदू मुलासोबत फिरते म्हणून एका मुस्लिम मुलीला मारहाण

96

संभाजीनगर: हिंदू मुलासोबत फिरते म्हणून एका मुस्लिम मुलीला तिच्याच नातेवाईकांनी भर रस्त्यात तिला प्रचंड त्रास दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरलं झाल्यामुळे संपुर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. छत्रपती संभाजीनगर मधील एक तरुणी रस्त्याने चालली असताना त्या मुलीची छेड काढत तिला काही टवाळखोर तरुण त्रास देताना या व्हिडीओत दिसत आहे. हे तरुण तिचा फोन हिसकावून घेत तिला शिवीगाळ करतानाही दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने संबंधित तरुणांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

एबीपी माझा वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. ही घटना २४ तारखेची असल्याची माहिती मिळत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुलीच्या आई वडीलांनी हे अपापसातील प्रकरण असल्याचे सांगत याबद्दल तक्रार देण्यास नकार दिला. मिळालेल्या माहितीनुसार, मुलगी तिच्या एका मित्राबरोबर फिरायला गेली होती. यावेळी पिडीत मुलीच्या ओळखीच्या तरुणांनी तिची रस्त्यावर छेड काढण्यास सुरुवात केली. तो मुलगा कोण आहे? अशी विचारणा करत तिला भररस्त्यात मारहाणही केली. टवाळखोरांनी तिचा बुरखाही फाडला. ही घटना घडत असताना तिच्यासोबत असलेले मित्र मैत्रिणीही निघून गेले. त्यानंतर या टोळक्याने मुलीचा पाठलाग करत तिला भर रस्त्यात त्रास देत तिला मारहाण केली. विशेष म्हणजे तरुणीला मारहाण करणाऱ्या टोळक्यातीलच एकाने तो व्हिडीओ काढल्याचे दिसत आहे.