Home स्टोरी हिंदू धर्म हा जगातील एकमेव धर्म आहे. बाकी सर्व धर्म संस्था आहेत!...

हिंदू धर्म हा जगातील एकमेव धर्म आहे. बाकी सर्व धर्म संस्था आहेत! अभिनेते शरद पोंक्षे

91

कुडाळ प्रतिनिधी: (१३ एप्रिल): स्वातंत्र्यवीर सावरकर हे शौर्याचा इतिहास असलेले एक लढवय्ये नेते होते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गेल्या ७५ वर्षानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्र सरकारने शासकीय पातळीवर वीर सावरकर गौरव यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात आयोजित करून वीर सावरकरांच्या कार्याचा गौरव केला. हिंदू धर्म हा जगातील एकमेव धर्म आहे. बाकी सर्व धर्म संस्था आहेत. हिंदू धर्माचा पुरस्कर्ते स्वातंत्र्यवीर सावरकर होते. त्यांनीच हिंदू राष्ट्र निर्मितीचे स्वप्न पाहिले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी ते नेहमीच झटले. स्वातंत्र्यवीर सावरकर हे शौर्याचा इतिहास असलेले एक लढवय्ये नेते होते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गेल्या ७५ वर्षानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्र सरकारने शासकीय पातळीवर वीर सावरकर गौरव यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात आयोजित करून वीर सावरकरांच्या कार्याचा गौरव केला. याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस व सरकारचे अभिनंदन करावे तितके थोडेच आहे, असे गौरवोदगार सावरकरप्रेमी सिने नाट्य अभिनेते शरद पोंक्षे यांनी कुडाळ येथील कार्यक्रमात करून वीर सावरकर यांचे जीवन चरित्र उलगडले.     

स्वामी समर्थ प्रतिष्ठान, कुडाळ, देशप्रेमी नागरिक मंच आणि शिवप्रेमी संघटना, सिंधुदुर्ग यांच्या वतीने बुधवारी सायंकाळी कुडाळ येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले. या यात्रेचा समारोपानंतर बाबा वर्दम स्मृती रंगमंच, कुडाळ येथे शरद पोंक्षे यांच्या वीर सावरकर यांच्या जीवन चरित्र (सावरकर विचार दर्शन) या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिमा पूजन करून व्याख्यानाला सुरूवात करण्यात आली.

यावेळी रणजित देसाई, राजू राऊळ, डाॅ.कुलकर्णी, मिलिंद देसाई, उमेश गाळवणकर, आनंद वैद्य, संजीवनी देसाई, केदार सामंत, योगेश तुळसकर, रमाकांत नाईक, विवेक पंडीत, विवेक मुतालिक, दादा साईल, अजय शिरसाट, बंड्या सावंत, विष्णू खोबरेकर, डाॅ.अभय सावंत, रूपेश कानडे, सीए अशोक सारंग, अभय सामंत, हेमंत जाधव, सौ.संध्या तेरसे, सौ.उषा आठल्ये, सौ. कविता कुंटे, सौ. अंजली मुतालिक, अरविंद करलकर, नंदीता पाटकर, अदिती सावंत, अक्षता कुडाळकर, विशाखा कुलकर्णी, देवेंद्र सामंत आदींसह सावरकर प्रेमी व नागरीक उपस्थित होते.

यावेळी श्री.पोंक्षे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा संपूर्ण जीवनपट उलगडून त्यांच्या कार्याची माहीती दिली. ते म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कार्य मोठे आहे. त्यांनी हिंदू राष्ट्र निर्मितीचा ध्यास घेतला होता. भारत देश १९४७ साली स्वतंत्र झाला. भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपले आयुष्य पणाला लावले. तुरूंगवासही भोगला. अशा या महान सुपुत्राचा गौरव होणे आवश्यक होते. मात्र काहींनी गलिच्छ राजकारण करून स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अपमानित केले. परंतु देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गेल्या ७५ वर्षाच्या इतिहासात प्रथमच महाराष्ट्र राज्यात सर्वत्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या शासकीय पातळीवरून गौरव यात्रेचे आयोजन करून त्यांचे विचार लोकांपर्यंत पोचवले जात आहेत. वीर सावरकर यांच्या कार्याचा राज्यभर प्रत्येक विधानसभा मतदारसंघात गौरव केला जात आहे, हे निश्‍चितच अभिमानास्पद आहे. शासकीय पातळीवरून वीर सावरकर यांच्या गौरव यात्रेचे राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच आयोजन करून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याचा कार्याचा सन्मान केला, याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे आपण अभिनंदन करतो, असे श्री.पोंक्षे यांनी सांगितले.