Home स्टोरी हिंदु समाजाच्‍या संयमाचा अंत पाहू नका! आमदार नितेश राणे!

हिंदु समाजाच्‍या संयमाचा अंत पाहू नका! आमदार नितेश राणे!

153

श्रीगोंदे (अहिल्‍यानगर) येथील हिंदु जनआक्रोश मोर्चा….

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: आम्‍ही सर्वधर्मसमभाव जपणारी मंडळी आहोत; पण गेल्‍या काही दिवसांत श्रीगोंद्यासह विविध भागांत बळजोरीने धर्मांतर करण्‍याचे प्रकार चालू झाले आहेत. औरंगजेबाच्‍या उदात्तीकरणाचे प्रकार समोर येत आहेत. हिंदु समाजाच्‍या विरोधात चालू असणारे हे षड्‌यंत्र कसे मोडीत काढायचे, ते आम्‍हाला ठाऊक आहे आणि त्‍यादृष्‍टीने आमची सिद्धता चालू झाली आहे. हिंदु समाजाच्‍या संयमाचा कुणी अंत पाहू नये, त्‍यांचा बंदोबस्‍त करू, अशी चेतावणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी दिली. श्रीगोंद्यात चालू असणार्‍या पशूवधगृहांवर कारवाई न करणार्‍या अधिकार्‍यांना सरकारी शिक्षा मिळणार असल्‍याची चेतावणी त्‍यांनी दिली. येथील तहसील कार्यालयावर ६ जुलैला हिंदु जनआक्रोश मोर्च्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते. त्‍या वेळी ते बोलत होते.राणे पुढे म्‍हणाले की, ज्‍या पद्धतीने हिंदूंंना लक्ष्य करण्‍याचा प्रयत्न काही जातीयवादी शक्‍ती करत आहेत, ते सगळ्‍यांसाठी घातक आहे. या भागातही धर्मांतराचा प्रयत्न झाला आहे.