Home Uncategorized हात जोडतो, पण कचरा घंटागाडीतच टाका! नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांचं कसई –...

हात जोडतो, पण कचरा घंटागाडीतच टाका! नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांचं कसई – दोडामार्ग शहरातील नागरिकांना आवाहन…

430

दोडामार्ग : ‘हात जोडूनी विनंती करतो, पण कचरा उगड्यावर न टाकता नगरपंचायतच्या घंटागाडीतच टाका’ , असे भावनिक आवाहन ‘स्वच्छ सुंदर कसई दोडामार्ग’ शहरासाठी ध्यास घेतलेल्या नगर पांचायतचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी दोडामार्ग शहरातील नागरिकांनी केले आहे. शनिवारी नगरपंचायतने शहरातील सुका व ओला कचरा संकलनसाठी नव्याने खरेदी केलेली ट्रॅक्टर ट्रॉलीचा श्रीफळ वाढवून शुभारंभ केला आहे. विशेष म्हणजे गेली पाच – दहा वर्षे धूळ खात पडलेल्या सक्षन व्हॅन ट्रॅक्टरला नव्याने आणलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीची जोडणी करून ती उपयोगात आणल्याने नगरपंचायतने जनतेचे लाखो रुपये कमी आले असून नव्या घंटा गाडी खरेदीसाठी होणाऱ्या लाखो रुपयांची सुद्धा बचत झाली आहेत. केवळ २ लाख ६५ हजार रुपये खर्ची घालू नगरपंचायतने या लिफ्ट कचरा ट्रॅक्टर ट्रॉलीची खरेदी केली आहे. नगरपंचायतची एक जुनी कचरा गाडी जीर्ण झालेल्या आता या ट्रॅक्टर ट्रॉलीतून शहरातील कचरा संकलन होणार आहे. याच कचरा ट्रॉली व त्यातून कचरा संकलनाचा शनिवारी नगराध्यक्ष चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण व शुभारंभ करण्यात आला. यावेळी चेतन चव्हाण यांनी मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत ट्रॅक्टर ट्रॉली खरेदी माहिती देत कचरा संकलन बाबत नागरिकांना आवाहन केलं. यावेळी त्यांच्यासमवेत उपनगराध्यक्ष देविदास गवस, बांधकाम सभापती नितीन मणेरीकर, शिक्षण व आरोग्य सभापती, गौरी पार्सेकर, महिला व बालकल्याण सभापती ज्योती जाधव, क्रांती जाधव, संजना म्हावळणकर, रामचंद्र मणेरीकर, माजी नगरसेवक सुधीर पनवेलकर, प्रकाश सावंत, मनोज पार्सेकर यासह नगरपंचायतचे अधिकारी प्रबोधन मठकर, संजय शिरोडकर, व स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते.श्री चव्हाण पुढे म्हणाले की, जी कचरा-घंटा गाडी होती ती जीर्ण झाली होती. त्यामुळे कचरा गोळा करण्यासाठी नवीन गाडी खरेदी करणे आवश्यक होते. त्याच पार्श्भूमीवर आमच्याकडे उपलब्ध असलेल्या ट्रॅक्टरने फक्त ट्रॉली खरेदी करून कचरा संकलन करणे कमी खर्चाचे व नगरपंचायतच्या निधीची बचत होणारी होती. म्हणूनच सर्व पदाधिकारी व नगरसेवक यांचेशी चर्चा करून नगरपंचायतने ही ट्रॅक्टर ट्रॉली फक्त २ लाख ६५ हजार रुपयांना इन्शुरन्स सह खरेदी केली. आणि ही ट्रॉली सक्शन व्हॅनच्या ट्रॅक्टरला जोडून आता शहरातील कचरा गोळा करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी आपला कचरा या घंटा गाडीत टाकून नगरपंचायतला सहकार्य करावे असे आवाहन केलं आहे.इतकंच नव्हे तर स्वच्छ सुंदर शहरासाठी आम्ही नियोजन बद्ध काम करत असून आमचे स्वच्छता कर्मचारी सुद्धा मेहनत घेत आहेत. त्यामुळे आपली हात जोडून सर्वांना विनंती आहे की, आपल्या घरातील कोणताही कचरा उघड्यावर टाकू नये. तर आपल्या ग्रामपंचायतच्या घंटा गाडीत टाकून दोडामार्ग शहराला स्वच्छ सुंदर बनवाव असे आवाहन केले आहे.नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी स्वच्छ सुंदर शहरासाठी नागरिकांना हात जोडून विनंती आली तरी दुसर्या ठिकाणी बेशिस्त वागणाऱ्या नागरिकांना तितकीच कडक कारवाई करण्याची तयारी दाखवली आहे. जे नागरिक अर्ज विनंती करूनही आपल्या घरातील कचरा उगड्यावर टाकून शहरातील स्वच्छतेला गालबोट लावत असतील तर अशा नागरिकांना पाचशे रुपयांची दंडात्मक कारवाई करण्याचेही नगरपंचायतने निर्णय घेतला आहे. त्यामुळे विनंतीला मन अन्यथा दंडात्मक कारवाई साठी त्या लोकांना तयार रहावे लागणार आहे.