Home स्टोरी हडपीड स्वामी समर्थ मठ येथे १८ रोजी स्वामी समर्थ पुण्यतिथी सोहळा!

हडपीड स्वामी समर्थ मठ येथे १८ रोजी स्वामी समर्थ पुण्यतिथी सोहळा!

71

मसुरे प्रतिनिधी: श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचालित श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड येथे १८ एप्रिल २०२३ रोजी श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात येणार आहे.सकाळी ७:०० ते १० पादुका पूजन, होमहवन, सकाळी १०:३० ते १२:०० नामस्मरण, सकाळी ११:०० ते १२:०० पालखी सोहळा, दुपारी १२.०० ते ९.००महाआरती, दुपारी १:०० ते ३:०० महाप्रसाद,सायं ३:०० ते ५:00 नामस्मरण सप्ताहाची सांगता, सायं ५:०० ते ८:०० सुस्वर भक्तीगीतांचा कार्यक्रम,रात्रौ ८:०० वा.कलांकुर ग्रुप मालवण निर्मित मराठ मोळा नजराणा आदी कार्यक्रम होणार आहेत. उपस्थितिचे आवाहन अध्यक्षश्री. प्रभाकर राणे, सचिव तथा अक्कलकोट भूषणश्री. नंदकुमार पेडणेकर,श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबईसंचालित : श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड कार्यकारी मंडळ (मुंबई) – गाव समिती (हडपीड देवगड) यांनी केले आहे.