Home स्टोरी स्वामी भक्तीतच समाधानी जीवनाचे राजमार्ग! शिक्षणमंत्री दीपक केसरकर 

स्वामी भक्तीतच समाधानी जीवनाचे राजमार्ग! शिक्षणमंत्री दीपक केसरकर 

275

आध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रात वटवृक्ष देवस्थानचे महान कार्य.

 

अक्कलकोट श्री स्वामी समर्थांच्या चरणी मंत्री दीपक केसरकर नतमस्तक.

 

अक्कलकोट प्रतिनिधी: देवाने जे दिले आहे त्यात समाधान मानणे यातच जीवनाची धन्यता आहे. त्याकरिता भाविकांनी स्वामीभक्तीत गुंतून स्वामींचे नामस्मरण, मनन, चिंतन करीत राहणे यातच जीवनाचे सौख्य सामावले आहे. स्वामी भक्तीने जीवनाचा अर्थ समजून जीवन सोपे होते, कारण स्वामीभक्तीतच समाधानी जीवनाचे राजमार्ग आहेत. आध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रात वटवृक्ष देवस्थानचे कार्य खुप महान असल्याचे मनोगत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले.

अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त पहाटेच्या काकड आरती प्रसंगी त्यांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी दीपक केसरकर यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. या प्रसंगी बोलताना केसरकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष ननू कोरबू, मंदिर समितीचे व्यंकटेश पुजारी, मंदार महाराज पुजारी, गिरीश पवार, संजय पवार, सचिन हन्नूरे, भिमा मिनगले, श्रीकांत मलवे, प्रसाद सोनार, सागर गोंडाळ, इत्यादी उपस्थित होते.