Home स्टोरी स्वच्छ सर्वेक्षण निवडी अंतर्गत गोळवण सरपंचांचा पालकमंत्री करणार सन्मान!

स्वच्छ सर्वेक्षण निवडी अंतर्गत गोळवण सरपंचांचा पालकमंत्री करणार सन्मान!

136

जिल्ह्यातून १५ ग्रामपंचायतचा समावेश….

 

मसुरे प्रतिनिधी:

 

स्वच्छ सर्वेक्षण (ग्रा) २०२३ अंतर्गत जिल्हास्तरावर निवड झालेल्या मालवण तालुक्यातील गोळवण ग्रामपंचायत सरपंच सुभाष लाड व ग्रामसेवक यांच्या सत्कार कार्यक्रमांचे आयोजन जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत १० सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वा शरद कृषी भवन, सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित करण्यात आला आहे. कणकवली तालुक्यातील लोरे, कोळोशी, कलमठ. कुडाळ तालुक्यातून कसाल, कुंदे, माणगाव. वेंगुर्ले मधून परुळेबाजार, उभादांडा, दोडामार्ग मधून कुंब्रल, सावंतवाडी मधून निरवडे, मळेवाड. देवगड मधून दाभोळे, बापर्डे तर वैभववाडी मधून सडूरे या गावच्या सरपंच व ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी यांना उपस्थित राहणेबाबत कळविण्यात आले आहे.