नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे रोखठोक वक्तव्यासाठी खुप प्रसिद्ध आहेतच. परंतु बऱ्याच वेळी त्यांचे वक्तव्य त्यांच्यावरच उलटलेले आहे. अशीच घटना सध्या राज्यात घडली आहे.
राज्य शासनाने अनेक विभागांमध्ये महत्त्वाच्या पदांवर बाहेरील यंत्रणेच्या माध्यमातून मनुष्यबळ घेण्याचा निर्णय घेतला आहे . तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये सरकारविषयी चीड निर्माण झालेली आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनावर होणारा खर्च हा मोठ्या प्रमाणात असूनही इतक्या पगारात खासगी कंपनीमध्ये तीन-चार कर्मचारी दर्जेदार काम करू शकतील.असे वक्तव्य केल्यामुळे सरकार शासकीय पदभरतीसाठी इच्छुक नसल्याचे समोर आले आहे.