Home स्टोरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्यात सप्टेंबर-ऑक्टोबर या कालावधीत लागणार!

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्यात सप्टेंबर-ऑक्टोबर या कालावधीत लागणार!

114

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: निवडणूक आयोगाच्या पत्रात उल्लेखराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या बंडानंतर राजातील राजकीय वर्तुळात हालचालींनी वेग आला आहे. राज्यातील आगामी निवडणूकीच्या दृष्टीने जागांसाठी राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे.यादरम्यान राज्य निवडणूक आयोगाने लवकरच निवडणूका लागण्याचे मोठे संकेत दिले आहेत. राज्यात सप्टेंबर – ऑक्टोबरदरम्यान निवडणुका लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या राजपत्रात निवडणुकीचा उल्लेख करण्यात आल्याने लवकरच निवडणूकांचा धुरळा पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

निवडणूक आयोगाचे मोठे संकेत!

सप्टेंबर-ऑक्टोबरदरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. दरम्यान असा उल्लेख निवडणूक आयोगाच्या राजपत्रात करण्यात आला आहे. तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकींसाठी मतदार याद्या तयार करण्यासाठी अधिसूचित काढण्यात येत असल्याचा देखील उल्लेख यामध्ये करण्यात आला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिका निवडणुकांबाबात देखील अशीच माहिती समोर आली होती. लांबणीवर पडलेल्या राज्यातील पालिका निवडणुका होण्याचे संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.मुंबई महापालिकेच्या निवडणूक ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये होतील, असा अंदाज देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी वर्तवला आहे.तर फडणवीस म्हणाले होते की, ‘आम्ही लांबवल्या नाहीत. तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने अनेक याचिका दाखल केल्यामुळे निवडणुका लांबल्या आहेत. त्याचबरोबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये बीएमसी निवडणुका होतील, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.