कल्याण प्रतिनिधी: – कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील रस्ते आणि गल्लो गल्ली लावण्यात आलेल्या दिव्यांच्या (स्टेट लाईट ) चालु बंद होण्याच्या वेळात गेल्या ४ ते ५ दिवसांपूर्वी अचानकपणे १५ ते २० मिनीटांचा बदल करण्यात आल्यामुळे नागरीकांत संताप व्यक्त करण्यात येत आहे .मुख्य रस्त्यांवरील आणि गल्ली बोळात लावलेल्या स्टेट लाईटस् गेली ४ ते ५ दिवस झाले सायंकाळी अंधार पडल्यावर १५ ते २० मिनिट उशीराने चालु तर सकाळी पूर्ण उजेड पडण्या पूर्वीच १५ ते २० मिनिटे आधीच बंद होत आहेत .अचानक पणे झालेल्या या बदला बाबत संबंधीतांकडे विचारणा केली असता या बदलामुळे महापालिकेचा विज वापरावर होणाऱ्या विज बिल खर्चाची मोठ्या प्रमाणावर प्रती दिन मोठी बचत होत आहे .परंतु याच बदला मुळे सायंकाळी उशीरा दिवे लागत असल्यामुळे गल्ली बाळातील नागरी वस्तीतील अंधारामुळे बाहेरील मच्छर नागरीकांच्या घरात घुसत असून या मुळे महापालिकेचा विज विभागच अप्रत्यक्षपणे रोगराईला निमंत्रण देत असून या बदलामुळे गल्लीबोळातून ये जा करतांना महिला तसेच जेष्ठ नागरीकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे .अशाच प्रकारे पहाटे नैसर्गिक उजेड पडण्यापूर्वीच दाटीवाटीच्या नागरी वस्तीतील गल्ली बोळातील स्टेट लाईट अंधार असतांनाच बंद होत असल्याने कामावर निघणारे चाकरमानी तसेच शाळेसाठी धावपळ करणार्या विद्यार्थ्यांना विशेषतः भटक्या कुत्र्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे .नागरीकांच्या पैशातून अत्यावश्यक सेवा म्हणून पुरविल्या जाणार्या स्टेट लाईटच्या विज बिलाट काटकसर करण्याच्या उद्देश्याने स्टेट लाईट चालु आणि बंद करण्याच्या वेळेत केलेल्या या आगावूपणाच्या बदलाचा त्रास मात्र सामान्य नागरीकांना सहन करावा लागत आहे.