पोलिस अजून एकाचा शोध घेत आहे. त्याला ताब्यात घेतल्यानंतर तिघांची एकत्र कसून चौकशी करण्यात येणार आहे. कारण त्यांच्यासोबत आणखी काही तरुणांचा संपर्क असणार असल्याची पोलिसांना शंका आहे. त्यामुळे पोलिस तिसऱ्या तरुणाचा शोध घेत आहेत.
सोशल मीडियावर सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने तलवार व कोयत्यासह रिल्स बनवणाऱ्या तिघा जणांवर शिक्रापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून यातील दोन जणांना कोयता आणि तलवार सह अटक करण्यात आली आहे. पुण्यात मागच्या कित्येक दिवसांपासून अनेक तरुणांनी दहशत पसरवली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी सोशल मीडियावर दहशत निर्माण करणाऱ्या ताब्यात घेतलं आहे. राज्यातील अनेक तरुणांना आतापर्यंत पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अनेकदा तरुण तलवारी आणि कोयते हातात पकडून व्हिडीओ (reels) तयार करतात, एखादी तक्रार आल्यानंतर त्या तरुणाला पोलिस ताब्यात घेतात.
पुण्यात कोयता गँगची दहशत वाढत असताना शिक्रापूर पोलिसांनी सोशल मीडियातील फेसबुक, इंस्टाग्राम याची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे . यावेळी गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाल्यानंतर लोकांमध्ये दहशत पसरविण्यासाठी सोशल मीडियावर रील्स बनवण्याकरिता तीन मुले हातात कोयता व तलवार घेऊन रस्त्यावर फिरत आहेत. त्या ठिकाणी शिक्रापूर पोलिसांनी कारवाई करत दोन मुलांना एक कोयता व एक तलवारीसह अटक केली आहे.
तिसऱ्याचा शोध
पोलिस अजून एकाचा शोध घेत आहे. त्याला ताब्यात घेतल्यानंतर तिघांची एकत्र कसून चौकशी करण्यात येणार आहे. कारण त्यांच्यासोबत आणखी काही तरुणांचा संपर्क असणार असल्याची पोलिसांना शंका आहे. त्यामुळे पोलिस तिसऱ्या तरुणाचा शोध घेत आहेत. ताब्यात घेतलेल्या तरुणांचा आणि पुण्यात फिरणाऱ्या तलवार घेऊन तरुणांचा काही संबंध आहे का ? याची सुद्धा चौकशी होणार आहे.