Home राजकारण सोशल मिडीयावरील व्हिडीओचा उगम शोधणे म्हणजे ‘कोंबडी आधी की अंडे आधी ‘...

सोशल मिडीयावरील व्हिडीओचा उगम शोधणे म्हणजे ‘कोंबडी आधी की अंडे आधी ‘ इतके अवघड काम असतांना पोलिसांनी सुतावरून स्वर्ग कसा गाठला? शितल म्हात्रे कथीत वायरल व्हिडीओ प्रकरणी सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला प्रश्न !

194

कल्याण प्रतिनिधी: (आनंद गायकवाड ) – मुंबई महानगर पालिकेच्या माजी नगरसेविका शितल म्हात्रे यांच्या कथीत वायर व्हिडीओ प्रकरणी वसई पोलिसांनी तिसगांवातून संशयीत आरोपी म्हणून अटक केलेल्या विनायक डायले याच्या कुटुंबियांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या फायर ब्रँड उपनेत्या सुषमाताई अंधारे यांनी भेट घेतली . या नंतर प्रसार माध्यमांशी बोलतांना या प्रकरणी पोलिसांच्या भूमिकेविषयी त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या कुटूंबियांच्या पाठीशी ठाम पणे उभा असल्याचा विश्वास व्यक्त केला .संशयीत आरोपी म्हणून तिसगावातून वसई पोलिसांनी अटक केलेल्या विनायक डायले याची झालेली अटकच मुळात चुकीची असल्याचे सुषमाताई यांनी सांगितले .सोशल मिडीयावरील वायरल व्हिडीओचा उगम शोधणे म्हणजे ‘कोंबडी आधी की अंडे अधी ‘ इतके हे गुंतागुंतीचे काम असतांना पोलिसांनी सुतावरून स्वर्ग गाठत विनायक डायले ला अटक कशी केली? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला, कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या नाकर्तेपणाच्या भूमिकेवरही त्यांनी संताप व्यक्त करतांना सांगितले की डायले कुटुंबीयांवर जो धमकावण्याचा प्रकार झाला त्या धमकावणार्‍यांच्या नावानिशी तक्रार घेण्यास पोलिसांनी नकार देणे म्हणजेच येथील स्थानिक पोलिसही कोणाच्या तरी दबावाखाली काम करत आहे का? अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली .एखाद्याची बदनामी करण्यासाठी सोशल मिडीयाचा वापर करणे ही भाजपचीच संस्कृती असल्याचे त्यांनी सांगितले,शितल म्हात्रे बदनामी प्रकरणी पोलिसांनी संशयीतांवर लावलेले कलमच शितल म्हात्रे यांना अधीक बदनाम करण्यात असल्याचेही त्यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींच्या निदर्शनास आणून दिले . याच बरोबर विनायक डायले याच्या साठी पक्षाच्या माध्यमातून सर्व सनदशीर मार्गाने लढा उभा करण्यात येणार असून डायले कुटूंबियांच्या पाठीशी आमचा पक्ष सर्व शक्तीनीशी उभा रहाणार असल्याचेही त्यांनी सांगितले .या समयी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख शरद पाटील, उप जिल्हा प्रमुख हर्षवर्धन पालांडे, महिला आघाडी प्रमुख विजया पोटे, स्थानिक विभाग प्रमुख राजेंद्र गायकवाड, उपशहर प्रमुख हेमंत चौधरी यांचे सह सर्वश्री किरण निचळ, गणपत गुघे, गंबाजी लाड, कमलाकर इंदरकर,अरुण निंबाळकर, ऋतू कांचन, कमलाकर आगवणे ,सचिन परब, शांताराम दिघे , माजी नगरसेविका शितल मेंढारी, महिला आघाडीच्या सौ . राधिका गुप्ते, आशा रसाळ, मिना माळवे, पल्लवी बांदिवडेकर , सीमा वेदपाठक , सोमनाथ भोईर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .