Home Uncategorized सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शौचालयाच्या तुटलेल्या टाकीत पडलेल्या मोकाट बैलाची घाडी कुटुंबियांनी...

सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शौचालयाच्या तुटलेल्या टाकीत पडलेल्या मोकाट बैलाची घाडी कुटुंबियांनी केली सुखरूप सुटका…

59

सातार्डा : सातार्डा देऊळवाडी येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शौचालयाच्या तुटलेल्या टाकीत रविवारी मध्यरात्री पडलेल्या मोकाट बैलाची घाडी कुटुंबियांनी सुखरूप सुटका केली. मोकाट बैल रविवारी रात्री घाडी यांच्या बाजूलाच असलेल्या शौचालयाच्या तुटलेल्या टाकीत पडला होता. टाकीतून बाहेर येण्यासाठी बैलाची धडपड सुरु होती. बैल टाकीत पडल्याचे पाहून शंकर घाडी, विठ्ठल घाडी यांनी पहाटेच्यावेळी त्या बैलाला बाहेर काढून सुखरूप सुटका केली. परिसरात गुरांचा वाढता उपद्रव तसेच शौचालय दुरुस्थिच्या मागणीचे निवेदन घाडी कुटुंबियांकडून ग्रामपंचायत कार्यालयाला देण्यात आले आहे. गेल्या वर्षभरापासून घाडी कुटुंबियांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायतने मोकाट गुरांच्या बंदोबस्त करण्याकडे व शौचालय मालकाला शौचालय दुरुस्थीसाठी पाठपुरावा केला नसतानाही घाडी कुटुंबियांनी माणुसकी दाखवून शौचालयाच्या टाकीत पडलेल्या बैलाला बाहेर काढून वाचविले आहे. शौचालयाची तुटलेली टाकी दुरुस्थीकडे इमारत मालकाने व बँकेच्या महाप्रबंधकांनी दुर्लक्ष केल्यामुळे बैल शौचालयाच्या टाकीत पडला. शौचालय दूरस्थ न केल्याने त्याचा त्रास घाडी कुटुंबियांना होत आहे. ग्रामपंचायतने शौचालय दुरुस्थीसाठी प्रयत्न करावेत व घाडी कुटुंबियांसमोर निर्माण झालेली दुर्गंधी नष्ट करावी अशी मागणी घाडी कुटुंबियांनी केली आहे.