Home स्टोरी सुचिता सदानंद बागवे हिला अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ शाखा मालवणच्या वतीने...

सुचिता सदानंद बागवे हिला अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ शाखा मालवणच्या वतीने आजारपणासाठी आर्थिक मदत

54

मसुरे प्रतिनिधी: मालवण तालुक्यातील श्रावण गावातील *कुमारी सुचिता सदानंद बागवे* हिच्या ऑपरेशनसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. श्री. सदानंद बागवे यांच्या घरची परिस्थिती सामान्य असल्यामुळे हा खर्च त्यांना पेलवणारा नाही.या बाबत दैनिक तरुण भारत मधून सुचिता हिच्या ऑपरेशनच्या खर्चासाठी मदतीचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ शाखा मालवणी आपल्या सदस्यांना मदतीसाठी आवाहन केले. सुचिता हिच्या आजारपणातील आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रास विचारात घेऊन संघटनेतील सदस्यांनी काही प्रमाणात रक्कम आर्थिक मदत म्हणून जमा केली. जमा झालेली सुमारे ३५ हजार रुपये रक्कम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत श्री. सदानंद बागवे यांना सुपुर्द करण्यात आली. यावेळी संघटनेचे सचिव गणेश सुरवसे, जिल्हा सदस्य सुभाष नाटेकर, राजेश भिरवंडेकर, दीपक वेंगुर्लेकर, शिवानंद सोलापुरे, चंद्रकांत माने, नामदेव एकशिंगे, परशुराम गुरव, विद्यालय पाटील, कृष्णा कोकाटे, देवानंद तेली, संदीप नलावडे, संतोष वरक, समीर चव्हाण, श्रावण सरपंच नम्रता मुद्राळे, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मीकांत मुद्राळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जगदीश चव्हाण, शिवराम परब आदी ग्रामस्थ उपस्थित होते. अखिल संघाचे जिल्हा सदस्य श्री. श्रीकृष्ण बागवे यांनीही आपल्या बागवे समाज सेवा संघ मसुरे देऊळवाडा यांच्यातर्फे रक्कम रुपये दहा हजार एवढी मोलाची मदत मिळवून दिली. अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ शाखा मालवण या संघटनेमार्फत विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी अनेक उपक्रम राबवले जातात. समाजातील गरजू कुटुंबांच्या अडीअडचणीच्या वेळी त्यांच्या समस्या जाणून घेऊन कुटुंबाप्रमाणे सदैव त्यांच्या पाठीशी उभी राहण्यारी ही एक संघटना आहे. कोविड 19 च्या काळात सुद्धा संघटनेच्या वतीने अनेक कुटुंबांना वस्तुरूप व आर्थिक मदत करण्यात आली होती. सुचिता ही आजारपणातून लवकर बरी होवो, व त्यांच्या कुटुंबाच्या मनोकामना पूर्ण होवोत ही सदिच्छा उपस्थित शिक्षकांनी दिली. तसेच समाजातील दानशूर व्यक्तींनीही मदत करण्याचे आवाहन केले.