Home क्राईम सिरीयातील लष्करी शिक्षण संस्थेवर ड्रोनद्वारे हल्ला! १०० लोकांचा मृत्यू.

सिरीयातील लष्करी शिक्षण संस्थेवर ड्रोनद्वारे हल्ला! १०० लोकांचा मृत्यू.

208

६ ऑक्टोबर वार्ता: सिरीयातील लष्करी शिक्षण संस्थेवर गुरुवारदि. ५ ऑक्टोबर रोजी मोठा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये जवळपास १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. अधिकृत सूत्रांकडून यासंदर्भातील माहिती देण्यात आली. स्थानिक शासनाच्या अधिपत्याखाली असणाऱ्या होम्स येथे झालेल्या या हल्ल्यासाठी स्थानिक माध्यमांनी दहशतवादी संघटनांना कारणीभूत ठरवलं आहे.

 

SANA या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार सिरीयातील लष्करानं एका अधिकृत पत्रकातून याबाबतची माहिती देत होम्स शहरात सशस्त्र दहशतवादी संघटनांनी लष्करातील अधिकाऱ्यांच्या पदवीदान सोहळ्यादरम्यानच हा हल्ला केल्याची बाब प्रकाशात आणली. सीरियन ऑब्जर्वेटरी फॉर ह्यूमन राइट्सच्या माहितीनुसार या ड्रोन हल्ल्यामध्ये १० हून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १४ नागरिकांसह लष्करी पदवीधरांचा समावेश असल्याचं सांगण्यात येतंय. हल्लेखोरांनी ड्रोनच्या माध्यमातून स्फोटकांचा वापर करत हा हल्ला केला. ज्यानंतर लष्करानंही दहशतवादी संघटनांविरोधात शस्त्र हाती घेतली. सीरियामध्ये झालेल्या या भयंकर हल्ल्यानंतर तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला.