सिक्कीम: सिक्कीममधील नाथुला पर्वताच्या खिंडीत नुकत्याच झालेल्या हिमस्खलनात ७ पर्यटकांचा मृत्यू, तर ११ जण घायाळ झाले आहेत. तेथे बचावकार्य चालू आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५० हून अधिक पर्यटक अजूनही १५ मैलांच्या पुढे अडकून पडले आहेत. बर्फात अडकलेल्यांपैकी ३० पर्यटकांना वाचवण्यात आले आहे. महानिरीक्षक सोनम तेनसिंग भुतिया यांनी सांगितले की, ‘‘पास केवळ १३ मैलापर्यंत दिले जातात; परंतु पर्यटक अनुमतीविना १५ व्या मैलापर्यंत गेले. ही घटना १५ व्या मैलावर घडली आहे.’’