Home स्पोर्ट सिंधू रनर्सच्या सर्धेत ब्युटीज ऑन व्हिलस सदस्यांनी पाडली छाप! ३ तासात मायलेकी...

सिंधू रनर्सच्या सर्धेत ब्युटीज ऑन व्हिलस सदस्यांनी पाडली छाप! ३ तासात मायलेकी धावल्या २५ किमी

99

मसुरे प्रतिनिधी: आजची तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे. अशा वेळी त्यांना त्यापासून परावृत्त करण्यासाठी व समाजात व्यायामाचे फिटनेसचे महत्व कळण्यासाठी जनजागृती करण्याचे काम सिंधू रनर टीम गेली चार वर्षे करत आहे. ६ तास व १२ तास सावंतवाडी रन यशस्वी पणे नुकतीच पूर्ण करण्यात आली. या स्पर्धेत ३ तास हा स्पर्धा प्रकार नवीन रनर साठी वाढवला होता. त्याला उत्स्फूर्त सहभाग मिळाला. एकूण ५५ स्पर्धक तिन्ही कॅटेगरी मधून रात्रौ ८ ते सकाळी ८ यावेळेत धावले.या स्पर्धेमध्ये ब्युटीज ऑन व्हील्स ग्रुपच्या सदस्यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत डॉ सोमनाथ परब यांनी ६ तासात ३५ किमी , तर प्रेरणा लोहार, कृतिका लोहार या मायलेकीने तीन तासात २५ किमी रन पूर्ण केले. त्यांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला.

डाॅ. स्नेहल गोवेकर, डॉ ओंकार पराडकर, डॉ प्रसाद कोरगावकर, डॉ.प्रशांत मडव, भूषण बांन्देलकर आदिनी ही रन पूर्ण होण्यासाठी विशेष मेहनत घेतली. सहभागी रनरना टीशर्ट, टाइम चिप, प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देण्यात आले.