Home स्टोरी सिंधू मित्र – सेवा सहयोग प्रतिष्ठान सावंतवाडीच्या “प्रतापगडाचा रणसंग्राम” कार्यक्रमाला शिवप्रेमींनी केली...

सिंधू मित्र – सेवा सहयोग प्रतिष्ठान सावंतवाडीच्या “प्रतापगडाचा रणसंग्राम” कार्यक्रमाला शिवप्रेमींनी केली मोठी गर्दी.

139

सावंतवाडी प्रतिनिधी: सिंधू मित्र – सेवा सहयोग प्रतिष्ठान सावंतवाडीच्या वतीने रविवार दि. २६ फेब्रुवारी रोजी सावंतवाडी राजवाडा येथे प्रतापगडाचा रणसंग्राम या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश डॉक्टर शिवरत्न शेटे यांचे प्रतापगडाचा रणसंग्राम या विषयावर विशेष व्याख्यान होते. तसेच या कार्यक्रमात भारतीय सैन्य दलात विशेष सेवा बजावलेल्या सैनिकांचा गौरव करणे हे मुख्य उद्दिष्ट होते.

मा. नायब सुभेदार श्री विनायक साबाजी बागायतकर (सेवानिवृत्त )

मा. नायब सुभेदार श्री विनायक साबाजी बागायतकर (सेवानिवृत्त) मुक्काम पोस्ट चराटे, तालुका सावंतवाडी यांनी भारतीय सैन्य दलात इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकॉम या तांत्रिक विभागात २४ वर्षे देशसेवा बजावली. विशेष म्हणजे त्यांनी कारगिल युद्धात सांबा सिमेजवळील जंगलात ६ महिने राहून रेडिओ टेलिकम्युनिकेशन विभागाचे दायत्व सांभाळले व कारगिल युद्धात भारत देशाला विजय प्राप्त करण्यास हातभार लावला. त्यांच्या या अतुल्य कामगिरीमुळे त्यांना एअर मार्शल कमोडेशन प्राप्त झाले. त्यामुळे माननीय नायक सुभेदार श्री विनायक साबाजी बागायतकर यांचे सिंधू मित्र – सेवा सहयोग प्रतिष्ठान सावंतवाडीच्या वतीने सन्मानपत्र व मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

हवालदार श्री धोंडी पांडुरंग पास्ते मु. पो. कलंबिस्त, ता. सावंतवाडी यांनी भारतीय सैन्य दलास १६ वर्षे देश सेवा बजावली. यादरम्यान त्यांनी आसाम, बिहार, राजस्थान, जम्मू-काश्मीरमध्ये ड्युटी निभावून देशसेवा केली. त्यामुळे त्यांना सामूहिक सैन्य पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यांच्या या कामगिरीसाठी सिंधू मित्र – सेवा सहयोग प्रतिष्ठान सावंतवाडीच्या वतीने मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.

मा. नायब सुभेदार श्री रामचंद्र विठ्ठल सावंत (सेवानिवृत्त) मुक्काम पोस्ट माणगाव, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग यांनी सैन्य दलात २५ वर्षे पंजाब रेजिमेंटच्या माध्यमातून देश सेवा केली. नागालँड, झारखंड, जम्मू-काश्मीरमध्ये न डगमगता त्यांनी देशसेवा केली. भारताच्या उत्तर व ईशान्य उत्तरी भागात जेथे जवळजवळ उणे ५० अंश तापमान असते. अशा ठिकाणी न डगमगता त्यांनी एकनिष्ठतेने देशसेवा केली. म्हणून त्यांना सिंधू मित्र – सेवा सहयोग प्रतिष्ठान सावंतवाडीच्या वतीने मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

ज्युडो कराटे प्रशिक्षक वसंत फकीर जाधव

श्री वसंत फकीरा जाधव मुक्काम पोस्ट कोलगाव, ता. सावंतवाडी यांनी १९७९ पासून सावंतवाडी येथे ज्युडो कराटे प्रशिक्षण सुरू केले आणि त्यांनी सावंतवाडी येथे १५०० खेळाडू व १०० वूनअधिक ज्युडो कराटे प्रशिक्षक घडविले. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना सिंधू मित्र – सेवा सहयोग प्रतिष्ठान सावंतवाडीच्या वतीने मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

मा. डॉ. श्री शिवरत्न शेटे

त्यानंतर माननीय डॉक्टर शिवरत्न शेटे यांनी प्रतापगडाचा रणसंग्राम यावर आपल्या खणखणीत आवाजात अभ्यासपूर्ण असे व्याख्यान सादर करून सर्व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. डॉ. शिवरत्न शेटे त्यांच्या प्रतापगडाचा रणसिंग्राम या व्याख्यानामुळे सावंतवाडीतील राजवाड्यातील वातावरण यांच्या आवाजाने दणदणून गेले. डॉक्टर शिवरत्न शेटे यांचे प्रतापगडाचा रणसंग्राम यावरील व्याख्यान ऐकण्यासाठी लोकांनी अफाट गर्दी केली होती.