Home Uncategorized सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्याची आत्महत्या..

सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्याची आत्महत्या..

117

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कुमार आशिष गेहालयान वय- वर्ष १९ याने सोमवारी पहाटे तो राहत असलेल्या वसतिगृह इमारतीच्या एका खोलीत गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मूळचा कर्नाल, हरियाणा येथील असलेला आशिष हा मागील वर्षभरापासून वसतिगृहात राहत होता. सध्या कॉलेज मध्ये पहिल्या वर्षाची प्रॅक्टिकल सुरू आहेत. परीक्षेला सामोरे जात असतानाच त्याने आत्महत्या केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, त्याने हे पाऊल का उचलेले? आत्महत्या का केली? याबाबतचे कारण स्पष्ट झाले नसून, पोलीस निरीक्षक हेमंत देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.