मसुरे प्रतिनिधी: स.का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या एनसीसी विभागामार्फत आज महिला दिन एका अनोख्या पद्धतीने या मसुरे गावामध्ये संपन्न केला आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे कौतुक करावे तेवढेच थोडे आहे. आज एनसीसीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेमध्ये मोठा फायदा होणार असल्यामुळे विद्यार्थ्यांनी सुद्धा जास्तीत जास्त एनसीसी क्षेत्राकडे वळावे. यापुढेही मर्डे ग्रामपंचायत च्या वतीने एनसीसी विद्यार्थ्यांना जे सहकार्य लाभेल ते दिले जाईल. सकाळ पाटील सिंधुदुर्ग कॉलेजचा आजचा हा उपक्रम सर्व जिल्ह्याला आदर्श असा आहे. असे प्रतिपादन मर्डे ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी शंकर कोळसुरकर यांनी मसुरे येथे बोलताना केले.
स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या एनसीसी विभागामार्फत आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सिंधुदुर्ग किल्ल्यापासून भरतगड किल्ल्यापर्यंत महिला सक्षमीकरण मशाल पेटवून 18 किलोमीटर अंतर मशाली घेऊन चालत पूर्ण करण्यात आले. सकाळी सिंधुदुर्ग किल्ला बंदर जेटी वर प्राचार्य ज्योती तोरस्कर मॅडम, योगा ग्रुपच्या अनुष्का चव्हाण या महिलांच्या हस्ते मशाली प्रज्वलित करून डॉ. शिवराम ठाकूर, यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून ट्रेकिंग कॅम्प उद्घाटन करण्यात आले. प्राचार्य ठाकूर सर व कृ सी देसाई शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी चंद्रशेखर कूशे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
योगा ग्रुप सदस्य व सुरत मॅडम यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्यात्यानंतर किल्ल्यापासून सिंधू कॉलेजच्या गेटवर आल्यानंतर कॉलेजच्या सर्व प्राध्यापकांनी व नॉन टीचिंग स्टाफ ने ट्रेकिंग रॅलीचे स्वागत केले. कांदळगाव मध्ये आल्यानंतर श्री रामेश्वर मंदिराचे पुजारी विठू गुरव व त्यांचे वडील यांनी मशाल ट्रेकिंग कॅम्पचे स्वागत करून आशीर्वाद रुपी प्रसाद दिलात्यानंतर १८ किलोमीटर अंतर चालून पूर्ण केल्यानंतर मर्डे ग्रामपंचायत सरपंच संदीप हडकर, ग्रामसेवक शंकर कोळसुलकर,मंडळ अधिकारी सुहास चव्हाण, तलाठी रविराज शेजवळ, कोतवाल श्रीकांत खोत, प्रतीक्षा परब, सचिन चव्हाण, बांदिवडे ग्रामपंचायत शिपाई श्री हडकर, मर्डे ग्रामपंचायत लिपिक महेश खोत, सुदर्शन मसुरकर, विनोद मोरे, शैलेश मसुरकर, श्री कमलेश ठाकूर, माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर या सर्वांनी या ट्रेकिंग कॅम्प व मशालींचे स्वागत केले. सर्वांनी आपली मनोगते व्यक्त केली. यामध्ये एनसीसी विभागाचा व एनसीसी विद्यार्थ्यांचा त्यांनी केलेल्या कार्याबद्दल गौरव करण्यात आला. अशाच प्रकारची वाटचाल पुढील काळात राहू दे अशा सदिच्छा दिल्या. त्यानंतर मशाली घेऊन भरत गडावर जाण्यात आले. त्या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना एनसीसी विभागामार्फत भोजन व्यवस्था करण्यात आली होती. अशा रीतीने ट्रेकिंग कॅम्पचे विसर्जन झाले. एकूण अंतर किलोमीटर एनसीसी विद्यार्थ्यांनी पायी चालत मशाली घेऊन मशाली सक्षमीकरणाच्या घोषणा देत पूर्ण केले. या कार्यक्रमाचे आयोजन एनसीसी विभाग प्रमुख असोसिएट एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट प्रा डॉ एम आर खोत, एनसीसी सीनियर नारायण मुंबरकर, प्रीती बांदल, तेजस पोळ, मिथिल मोरवेकर, तृप्ती माडिये, सिद्धी कुमठेकर, अर्जुन मालवणकर, बिरू खरात यांनी केले. लेफ्टनंट प्रा. डॉ.खोत सर यांनी एनसीसीच्या विद्यार्थ्यांना मिलिटरी, तटरक्षक दल पोलीस भरती ,एअर फोर्स ,नेव्ही रिलायन्स उद्योग, महाराष्ट्र कॅडेट फोर्स, पेरॅमिलीटरी व वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा यामध्ये एनसीसी विद्यार्थ्यांना सवलती दिल्या जातात. तसेच प्रथम प्राधान्य दिले जाते. असे आपल्या भाषणातून ग्रामपंचायत मसुरे या ठिकाणी स्पष्ट केले. सदर कॅम्प मध्ये कॉलेजचा जीएस ओंकार यादव तसेच सुरज शिवगण सहभागी होते.
फोटो कॅप्शन..मर्डे ग्रामपंचायतच्या विद्यार्थ्याने वतीने सका पाटील सिंधुदुर्ग कॉलेजच्या एनसीसी विद्यार्थ्यांचे मसुरे येथे स्वागत करताना ग्रामविकास अधिकारी शंकर कोळसुलकर मंडळ अधिकारी सुहास चव्हाण तलाठी रविराज शेजवळ आणि मान्यवर… छाया दत्तप्रसाद पेडणेकर