Home राजकारण सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हाअंतर्गत बदली नुसार एप्रिल अखेरीस जवळपास ४०० शिक्षक जाणार जिल्ह्याबाहेर!...

सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हाअंतर्गत बदली नुसार एप्रिल अखेरीस जवळपास ४०० शिक्षक जाणार जिल्ह्याबाहेर! युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांची माहिती

105

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यात परजिल्ह्यातील अनेक शिक्षक जिल्हा अंतर्गत भरती च्या माध्यमातून जवळपास ४०० शिक्षक ह्या एप्रिल च्या शेवटपर्यंत आपल्या जिल्ह्यात जाता आहेत.बदली मध्ये अर्थ पुर्ण तडजोड होत असल्याची चर्चा आहे,हे खरं असेल तर ही फार गंभीर बाब आहे.याकडे शिक्षणमंत्री दिपक केसरकर लक्ष देणार का ? जर अशाप्रकारे सिंधुदुर्ग जिल्ह्यात रुजू होऊन नंतर काही म्हणजे ५-१० वर्षांनी आपल्या जिल्ह्यात जात असतील तर स्थानिक डिएड उमेदवार का नको ? २००७ प्रमाणे भरती का नको? जिल्हाअंतर्गत बदलीचे शासन निर्णय होतात मग स्थानिक उमेदवार यांना भरती करून घेण्याचे शासन निर्णय का निघत नाहीत ? याच स्थानिकांच्या मतावर केसरकर आमदार ते शिक्षणमंत्री झाले हे केसरकर विसरले काय ? जिल्ह्यात काही ठिकाणी ग्रामीण भागात शिक्षकच नाहीत आणि त्यात शिक्षकांची बदली आणि नंतर परत जिल्हाबाहेरील उमेदवार यांची नेमणूक म्हणजे ५ वर्षानी परत ते आपल्या गावी नेमणूक करून घेतील. म्हणजे जिल्हावासीयांच्या तरुणांच्या,तरुणींच्या पदरात काय ? केसरकर तसेच पालकमंत्री यांना जिल्ह्यातील युवा वर्गाशी काहीही देणं घेणं नाही ते फक्त मतांसाठी तुमच्या दारावर येतील आणि सांगतील जिल्हा बदलतोय.

शिक्षण मंत्री दिपक केसरसकर

जिल्ह्यात बेरोजगारांची संख्या वाढवली, आम्ही जिल्हा बदलतो. हे सरकार खोके सरकार आहे. त्यामुळे या बदलीत देखील खोके आहेत. असा आरोप युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांनी केला आहे. युवासेना गप्प बसणार नाही आवाज उठवणार हे काही दिवसात दिसेल,स्थानिकांच्या पाठीशी युवासेना उभी राहील आणि सरकारला देखील झुकवेल. आज या माध्यमातून मी सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, मीडिया याना आवाहन करतो की स्थानिकांच्या पाठीशी उभे राहून या लढ्यात सहभागी व्हा. असेल आव्हाहन तालुकाप्रमुख योगेश धुरी यांनी केले आहे.