Home सनातन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हिंदुत्वनिष्ठांचे सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवासाठी दिल्लीकडे प्रस्थान.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हिंदुत्वनिष्ठांचे सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवासाठी दिल्लीकडे प्रस्थान.

50

सिंधुदुर्ग: ‘सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाउंडेशन’च्या प्रस्तुतीत आणि ‘सनातन संस्थे’च्या आयोजनात ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ हा भव्य सोहळा १३ आणि १४ डिसेंबर २०२५ रोजी नवी दिल्लीतील ‘भारत मंडपम’ येथे आयोजित केला आहे. हा कार्यक्रम ‘सनातन संस्थे’च्या रौप्यमहोत्सवी वर्षातील एक विशेष पर्व असणार आहे.

या महोत्सवासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सनातन संस्थेचे साधक, हिंदू धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ आणि मान्यवर यांनी ‘सनातन राष्ट्रा’चा जयघोष करत मोपा गोवा येथून विमानातून शनिवारी दिल्लीकडे प्रयाण केले. यावेळी हिंदुत्वनिष्ठांनी दिलेल्या घोषणांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी अनेकांनी कुतुहलाने चौकशी करून या महोत्सवाला शुभेच्छा दिल्या.

या महोत्सवाला अनेक संत-महंत, मान्यवर, विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित व्यक्तींची उपस्थिती असणार आहे. दिल्ली येथे प्रयाण केलेल्या मान्यवरांमध्ये मालवण येथील अधिवक्ता समीर गव्हाणकर, अधिवक्ता हेमेंद्र गोवेकर, अधिवक्ता गिरीश गिरकर, अधिवक्ता अविनाश पाटकर, अधिवक्ता पलाश चव्हाण, कुडाळ येथील श्री. हरिश्चंद्र वेंगुर्लेकर, बांदा येथील श्री. शिवराम देसाई, श्री. प्रदीप देसाई, श्री दत्त मंदिर न्यास, माणगावचे अध्यक्ष – श्री. सुभाष भिसे, सचिव – श्री. दीपक साधले यांचा समावेश आहे.

आपला नम्र,

 श्री. शंकर निकम

सनातन संस्था,

संपर्क : 75885 69433